अकोला: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्पपरिणामाबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा स्तरावर निबंध स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धेत सहभाग घेणाºया विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि स्पर्धेत पहिल्या तीन विजेत्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी लालबहादूर शास्त्री क्रीडांगणावर होणाºया कार्यक्रमात बक्षीस व सन्मानपत्र देण्यात येईल. शालेय स्तरावर या स्पर्धा आयोजित करून प्रत्येक स्पर्धेतील पहिले तीन क्रमांक तालुका स्तरावर माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात २0 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, शिक्षण विस्तार अधिकारी दिनेश दुतंडे यांनी कळविले.