अकोला, दि. २८- लाल कांद्यासोबतच विदर्भातील शेतकर्यांना आता दज्रेदार पांढर्या कांद्याचे भरघोस उत्पादन घेता येणार आहे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित ह्यअकोला सफेद ह्ण केलेल्या पांढर्या कांद्याची व्यावसायिक वृद्धी होण्यासाठी एका खासगी कंपनीसोबत गुरुवारी सामंजस्य करार केला आहे. ह्यअकोला सफेदह्ण कांद्यावर या कृषी विद्यापीठाने २00७ मध्ये संशोधन केले. त्यानंतर आतापर्यंत या कांद्याचे कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ व शेतकर्यांच्या शेतावर प्रात्यक्षिक,चाचण्या घेण्यात आल्या. चाचण्या परिक्षणात हे कांद्याचे वाण इतर वाणापेक्षा सरस ठरले आहे. हा कांदय़ाचे दुभाळकीचे प्रमाण अत्यल्प असून, पेंगळ्य़ाचे प्रमाण दोन टक्केही नाही, उत्पादनही एकरी १६0 ते १८0 क्विंटल एवढे आहे. पश्चिम विदर्भाचा काही भाग, मध्य व पूर्व विदर्भ, छत्तीसगड, मध्यप्रदेशात पांढर्या कांदय़ाचेच उत्पादन घेतले जाते. येथील शेतकर्यांना हा कांदा उत्पन्नात भर टाकणारा ठरला, असा विश्वास या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान,कृषी विद्यापीठाचे मिरची व भाजीपाला संशोधन केंद्र अकोला आणि जालना येथील एका क्रॉप सायन्स कंपनी दरम्यान सामंजस्य करार कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दिलीप मानकर व खासगी कंपनीचे आनंद जिंदाल, डॉ. पालवे, विभाग प्रमुख उद्यानविद्या डॉ. प्रकाश नागरे, बियाणे उपसंचालक डॉ. डी. टी.देशमुख, मिरची व भाजीपाला विभागाचे विभाग प्रमुख डॉ. श्याम घावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘अकोला सफेद’ कांदा पोहोचणार शेतावर !
By admin | Published: October 29, 2016 2:53 AM