अकोला : कोरोनाचा घसरणीला लागलेला आलेख आणि प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासन हळूहळू गाड्यांची संख्या वाढविण्याचे धोरण अवलंबिले आहे. याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेने २६ डिसेंबरपासून मुंबई ते कामाख्या/ गुवाहाटी दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून एकदा धावणार्या या विशेष गाडीला अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकरांच्या दिमतीला आणखी एक गाडी उपलब्ध होणार आहे.गाडी क्रमांक ०२२५६ अप ही विशेष गाडी २६ डिसेंबरपासून प्रत्येक शनिवारला सायंकाळी सहा वाजता कामाख्या स्थानकावरून रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता लोकमान्य तिलक टर्मिनस येथे पोहचेल. ही गाडी अकोला स्थानकावर दर रविवारी दुपारी १२.१७ वाजता येऊन १२.२० वाजता मुंबईकडे रवाना होईल.
गाडी क्रमांक ०२२५५ डाउन ही विशेष गाडी २९ डिसेंबरपासून प्रत्येक मंगळवारी लोकमान्य तिलक टर्मिनन्स येथून १३.१५ वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी १५.२५ वाजता कामाख्या येथे पोहचेल. ही गाडी दर बुधवारी रात्री ९.३२ वाजता येऊन ९.३५ वाजता नागपूरकडे रवाना होईल. या गाड्यांसाठी १६ डिसेंबरपासून आरक्षण सुविधा सुरु होणार आहे.