लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : साईबाबा जन्म शताब्दी सोहळ्य़ानिमित्त शिर्डी येथून साईबाबांच्या पादुकांचे अकोल्यात आगमन होत आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात दर्शनासाठी साईबाबांच्या पादुका ठेवल्या जाणार आहेत. या सोहळ्य़ाचे सेवाधिकारी आ.गोवर्धन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. साईबाबांच्या जन्म शताब्दीनिमित्त शिर्डी संस्थानच्या विश्वस्तांचे राजराजेश्वर नगरीत पहिल्यांदाच साईबाबांच्या पादुका घेऊन आगमन होत आहे. अकोलेकरांना साईबाबांच्या पादुकांचा लाभ मिळावा, यासाठी आ. गोवर्धन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली समित्यांचे गठन करण्यात आले आहे. शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरापासून सकाळी १0 वाजता पादुकांची शोभायात्रा निघणार आहे. मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात दर्शनासाठी पादुका ठेवल्या जातील. यावेळी मैदानावर दिव्यांग व मूकबधिर मातृशक्तीसाठी दर्शनाची वेगळी रांग लावण्यात येणार आहे. समितीचे अध्यक्ष हरीश मानधने तसेच सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांच्या देखरेखीत खा. संजय धोत्रे, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, डॉ.आर.बी. हेडा, हरीश आलिमचंदानी, ब्रिजमोहन चितलांगे, कैलास मामा अग्रवाल, समितीचे सचिव जगदीश मुंदडा यांनी सोहळा शांततेत पार पडावा, यासाठी समित्यांचे गठन केले आहे. त्यामध्ये किशोर मांगटे पाटील, बाळ टाले, रमेशचंद्र चांडक, सत्यनारायण जोशी, राजेश मिश्रा, देवेंद्र लटुरिया, प्रशांत निबाळकर, गिरीश जोशी, आशिष बाहेती, प्रदीप शर्मा, विजय जयपिल्ले, शरद चांडक, दिनेश गुजराथी, श्यामसुंदर मालपाणी, प्रयागराज मिरजामले, प्रा. एल.आर. शर्मा , संजय शर्मा, प्रशांत अवचार , सतीश तोष्णीवाल , अनिकेत जैस्वाल, सुभाष लढ्ढा, सत्यनारायण बाहेती, अनिल चांडक यांच्यासह महिला समितीमध्ये उपमहापौर वैशाली शेळके, सुमनताई गावंडे, उषा विरक, जान्हवी डोंगरे, सोनल ठक्कर यांच्यासह नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्त्या महिलांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे.