अकोला: जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांच्या लेखा परिक्षणातील मुद्दयांचे प्रलंबित अनुपालन अहवाल तयार करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ ) साैरभ कटियार यांच्या आदेशानुसार शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही जिल्हा परिषदेत कामकाज सुरु ठेवण्यात आले आहे.
लेखा परिक्षणातील मुद्दयांचे अनुपालन अहवाल शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे. परंतू जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांच्या लेखा परिक्षणातील मुद्दयांचे अनुपालन अहवाल तयार करण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यामुळे लेखा परिक्षणातील मुद्दयांचे अनुपालन अहवाल तयार करण्याची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार,७ नोव्हेंबर व रविवार, ८ नोव्हेंबर रोजी या सुटीच्या दोन दिवसात जिल्हा परिषदेचे कामकाज सुरु ठेवण्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार यांनी दिला. लेखा परिक्षणातील मुद्दयांचे अनुपालन अहवाल तयार करण्याचे प्रलंबित असलेल्या विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहून प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या. त्यानुसार शनिवारी सुटीचा दिवस असूनही जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत लेखा परिक्षणातील मुद्दयांचे अनुपालन अहवाल तयार करण्याचे कामकाज संबधित कर्मचाऱ्यांकडून सुरु होते. मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार सुध्दा सुटीच्या दिवशी कार्यालयात उपस्थित होते. रविवार, ८ नोव्हेंबर रोजीदेखिल जिल्हा परिषदेत संबंधित मुद्दयांचे कामकाज सुरु राहणार आहे.