अकोला : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाद्वारे बदल्यांची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या विविध पाच विभागातील ११ कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या.जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागातील वर्ग- ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाद्वारे बदल्यांची प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली. त्यामध्ये पहिल्या दिवशी (शुक्रवारी ) जिल्हा परिषद बांधकाम विभाग, कृषी विभाग, लघुसिंचन विभाग, कृषी विभाग, अर्थ विभाग व पशुसंवर्धन विभाग इत्यादी पाच विभागातील विविध संवर्गातील ११ कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाद्वारे बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये ४ प्रशासकीय आणि विनंतीवरून ७ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, संबंधित विभागांचे सभापती, संबंधित विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यां च्या उपस्थितीत समुपदेशनाद्वारे बदल्या करण्यात आल्या. उर्वरित विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया १४ व १५ मे रोजी पूर्ण करण्यात येणार आहे.विभागनिहाय कर्मचाऱ्यांच्या अशा करण्यात आल्या बदल्या !जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत एक स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाची विनंतीवरून बदली करण्यात आली. लघुसिंचन विभागांतर्गत दोन शाखा अभियंत्यांची विनंतीवरून, कृषी विभागांतर्गत एक विस्तार अधिकाºयाची प्रशासकीय बदली करण्यात आली. अर्थ विभागातील एक वरिष्ठ सहायक (लेखा ) प्रशासकीय तर एक कनिष्ठ सहायक (लेखा ) प्रशासकीय व एक कनिष्ठ सहायक (लेखा ) कर्मचाºयाची विनंतीवरून आणि पशुसंवर्धन विभागांतर्गत एक सहायक पशुधन विकास अधिकाºयाची प्रशासकीय, दोन पशुधन पर्यवेक्षकांची विनंतीवरून आणि एक पट्टीबंधकाची विनंतीवरून बदली करण्यात आली.