अकोला, दि. 0९: जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या कार्यालयांना भेट देऊन पाहणी केली असता, ५९ कर्मचारी कार्यालयात गैरहजर आढळून आले. दांडी मारणार्या संबंधित कर्मचार्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांनी (डीसीईओ) कारणे दाखवा नोटीस बजावली असून, तीन दिवसात खुलासा मागितला आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्यासह समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांनी मंगळवारी सकाळी ११ ते ११.३0 या वेळेत जिल्हा परिषद परिसरातील विविध विभागाच्या कार्यालयांना भेट देऊन, कार्यालयीन वेळेत उपस्थित अधिकारी-कर्मचार्यांच्या उपस्थितीबाबत पाहणी केली. त्यामध्ये सामन्य प्रशासन, पंचायत, अर्थ, ग्रामीण पाणीपुरवठा, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, बांधकाम, शिक्षण, आरोग्य आणि लघुसिंचन विभागाच्या कार्यालयात पाहणी करण्यात आली. त्यामध्ये कार्यालयीन वेळेत या सर्व विभागात विविध संवर्गातील ५९ कर्मचारी गैरहजर आढळून आले. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघाडे यांच्या निर्देशानुसार कार्यालयात गैरहजर आढळून आलेल्या संबंधित कर्मचार्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलाख खिल्लारे यांनी मंगळवारी सायंकाळी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले.विभाग गैरहजर कर्मचारी!सामान्य प्रशासन 0३पंचायत विभाग 0५अर्थ विभाग ११ग्रामीण पाणीपुरवठा 0३समाजकल्याण विभाग 0४पशुसंवर्धन 0५महिला-बालकल्याण 0८बांधकाम विभाग 0४शिक्षण विभाग 0३आरोग्य विभाग 0७लघुसिंचन विभाग 0६
अकोला जिल्हा परिषदेच्या ५९ कर्मचा-यांची दांडी
By admin | Published: August 10, 2016 1:16 AM