शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

अकोला जिल्हा परिषदेचे स्वनिधीतील सर्वात मोठे अंदाजपत्रक

By admin | Published: May 21, 2014 10:19 PM

२६ कोटी ८१ लाख ५९ रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सादर करताना सर्वच विभागांसाठी भरीव तरतूद करण्यात आली.

अकोला - जिल्हा परिषदेच्या इतिहासातील स्वनिधीचे सर्वात मोठे अंदाजपत्रक बुधवारी अर्थ सभापती राधिका धाबेकर यांनी सादर केले. २६ कोटी ८१ लाख ५९ रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सादर करताना सर्वच विभागांसाठी भरीव तरतूद करण्यात आली. लोकसभा आचारसंहितेमुळे हे अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी आधीच मंजूर केले असल्याने बुधवारी सभागृहाची औपचारिक मान्यता घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून (सेस फंड) यावर्षी सर्वच विभागाच्या मागणीनुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला. शिक्षण विभागाला तर मागणीपेक्षा अधिक निधी मिळाला आहे. आरोग्य विभागासाठी १ कोटी २६ लाख २0 हजार, शिक्षण विभागासाठी १ कोटी ७३ लाख ४५ हजार, पाणीपुरवठा विभागासाठी ३ कोटी, समाजकल्याणसाठी ४ कोटी ३१ लाख २ हजार, महिला व बालकल्याणसाठी १ कोटी ५२ लाख १५ हजार, कृषीसाठी ३ कोटी ५३ लाख ८0 हजार, पशुसंवर्धन ५ लाख १५ हजार, वनीकरण ५0 हजार, पंचायत विभाग २ कोटी ४ लाख ३१ हजार, लघुसिंचन २ लाख ५0 हजारांची तरतूद करण्यात आली आहे. या सभेत माझोडच्या पाणीपुरवठा योजनेची हद्द वाढ, विरोधी पक्षांना वाहन पुरविणे, घटस्फोटित महिलांसाठी घरकुल योजना, पूर्णेच्या दूषित पाण्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करणे, खांबोरा पाणीपुरवठा योजनेला पाणी पुरविणे आदी विषयांवर चर्चा झाली. ** समाजकल्याणसाठी निधी पळविण्याचा घाटकृषी आणि महिला व बालकल्याण विभागासाठी निर्धारित करण्यात आलेल्या निधीतून १ कोटीचा निधी समाजकल्याणसाठी वळता करण्याचा घाट सत्ताधारी भारिप-बमसंच्या सदस्यांनी सभागृहात घातला होता. मात्र, नितीन देशमुख, चंद्रशेखर पांडे गुरुजी, रेणुका दातकर आणि जोत्स्ना चोरे यांच्या प्रखर विरोधामुळे मूळ अंदाजपत्रकात कोणताही बदल न करता मंजूर करण्यात आले. ** समिती सदस्य निवड लांबणीवरजिल्हा परिषदेच्या दोन सदस्यांसह आकोट पंचायत समितीच्या सभापतींना कोणत्याही विषय समितीवर स्थान मिळाले नाही. त्यामुळे बुधवारच्या सभेत ही निवड केली जाणार होती. काँग्रेस आणि भाजपच्या गटनेत्यांमध्ये याबाबत सहमती न झाल्याने सदस्य निवड लांबणीवर पडली. सहा महिन्यांपासून काँग्रेसचे बोंद्रे, भाजपचे मनोहर हरणे आणि आकोटच्या सभापती समितीविना आहेत.