अकोला: जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून आयुष प्रसाद यांची शुक्रवारी शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली आहे.शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांची गुरुवारी मुंबई विभागाच्या शिधावाटप नियंत्रकपदी बदली करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश शुक्रवारी शासनामार्फत काढण्यात आला. त्यामध्ये घोडेगाव जिल्हा पुणे येथील सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक (आयटीडीपी) आयुष प्रसाद (भाप्रसे) यांची अकोला जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयुष प्रसाद भारतीय प्रशासन सेवेतील (भाप्रसे) २०१५ मधील तुकडीचे अधिकारी असून, जिल्हा परिषदेचे नवे ‘सीईओ’ म्हणून ते लवकरच अकोल्यात रुजू होणार आहेत.