अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता मुरहरी केळे मध्यप्रदेश सरकारच्या ‘ई-गव्हर्नन्स’ने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 02:28 PM2018-09-24T14:28:54+5:302018-09-24T14:30:05+5:30
अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांना मध्यप्रदेश शासनाद्वारे ई-गव्हर्नन्स उत्कृष्ठता पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
अकोला : महावितरणच्याअकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांना मध्यप्रदेश शासनाद्वारे ई-गव्हर्नन्स उत्कृष्ठता पुरस्कार देवून गौरविण्यात आले. भोपाळ येथे १८ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. १ लाख रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ.मुरहरी केळे हे अकोला परिमंडळ येथे रुजू होण्यापूर्वी मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनी लि. इंदूर येथे संचालक (तांत्रिक) या पदावर अडीच वर्ष कार्यरत होते.
मध्यप्रदेश शासनाद्वारे वर्ष २०१५ ते २०१७ या कालावधीत माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय विभागाना ई-गव्हर्नस उत्कृष्ठता पुरस्कार घोषित करण्यात आले होते. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन भोपाळ येथील आर.सी. व्ही. पी. नरोन्हा, प्रशासन अकादमी येथील सभागृहात करण्यात आले होते. यामध्ये मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनी लि. इंदूर यांनी विद्युत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित व पुर्नजोडणी करण्यासाठी विकसित केलेल्या स्वयंचलित यंत्रणा उत्कृष्ट ठरली. यासाठी डॉ. केळे यांना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमात मध्यप्रदेशचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री उमाशंकर गुप्ता, प्रधान सचिव प्रमोद अग्रवाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तन्वी सुन्दियाल यांच्या हस्ते वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आकाश त्रीपाठी आणि टीम लीडर तथा तत्कालीन संचालक (तांत्रिक) डॉ.मुरहरी केळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.