- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: आपला वैद्यकीय सांभाळत आॅस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या आंतररष्ट्रीय आयर्न मॅन या स्पर्धेत अकोल्याचे डॉ. पराग टापरे यांनी स्पर्धा जिंकत आयर्नमॅन हा पुरस्कार प्राप्त केला आहे. डिसेंबर २०१८ ते डिसेंंबर २०१९ या एका वर्षात ते देशात तिन ठिकाणी झालेल्या स्पर्धेत आयर्न मॅन पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. डॉ. पराग टापरे हे मुळचे जळगाव जामोद येथील रहिवाशी आहेत. पण सध्या अकोला येथे वैद्यकीय व्यवसायात व्यस्त असतांनाही त्यांनी काम व कुटूंब यातून वेगळा वेळ काढून नवनवीन यशाची शिखरे आतापर्यंत गाठली आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये बहरीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन या स्पर्धेत त्यांनी ७ तास ११ मिनिटात विजय प्राप्त केला होता. यामध्ये त्यात १.९१ किलोमिटर समुद्रात पोहणे, ९० किलोमिटर सायकलिंग आणि २१ किलोमिटर धावणे हे तिन्ही प्रकार ८ तासांच्या अवधीत पूर्ण केल्याची नोंद केली आहे. दरम्यान आॅक्टोबर २०१९ मध्ये गोवा येथे होवू घातलेल्या आंतरराष्ट्रीय ७०.३ आयर्न मॅन या स्पर्धेसाठी पुन्हा त्यांनी जानेवारीपासून सराव केला. दरम्यान जुलै २०१९ मध्ये त्यांचा अपघात होवून हाताला दुखापत झाली. पुन्हा सायकलला हात लावणार नाही असा म्हणणाºया डॉ. पराग टापरे यांनी पुन्हा ४५ दिवसात सरावाला सुरवातही केली. आणि गोव्याची आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन स्पर्धा त्यांचे मित्र डॉ. प्रशांत मुळावकर सर यांचे सह पूर्ण केली. यानंतर लगेचच आॅस्ट्रेलिया येथे १ डिसेंबररोजी याच स्पर्धेत उतरले. बुसेलटनची ७०.३ आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन स्पर्धा ही मागच्या वर्षीचा स्वत:चाच विक्रम मोडीत ७ तास ६ मिनिटात पूर्ण करून ५ मिनिटांचा वेळ राखत जिंकली. स्वत:चाच एक नवीन विक्रम स्थापित केला. जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि सोबतच प्रत्येक गोष्टींचं योग्य नियोजनामुळेच हे यश गाठल्याचे डॉ. पराग टापरे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
अकोल्याचे डॉ. पराग टापरे तिसऱ्यांदा बनले आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 2:17 PM