अकोला : अकोल्यातील महाराष्ट्र राज्य पशुधन विकास मंडळाच्या मुख्यालयाला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी मिळत नसल्याने या मंडळाचा कारभार वार्यावर आहे. मंडळांतर्गत येणार्या पशुधन विकासाच्या योजना खेचून आणण्यासाठीचे प्रयत्नही कमी पडत असल्याने शेतकर्यांना या मंडळाचा फायदाच काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोला येथे महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय आहे. गत दहा ते पंधरा वर्षांमध्ये या मंडळाला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी मिळाला नाही. शासनाने नव्याने एका अधिकार्यांची नियुक्ती केली; पण त्यांना येथे येण्यास वेळच मिळत नसल्याने शेतकरी, पशुपालकांसाठी स्थापन केलेले हे मंडळ नावापुरते उरले असल्याचा आरोप शेतकर्यांकडून केला जात आहे. या जिल्ह्यात शेती, दुग्धव्यवसाय रोजगाराची प्रमुख साधने आहेत. त्यापैकी दुग्ध व्यवसाय कोलमडला आहे. या व्यवसायाला आधार देण्यासाठी येथे राज्य पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय देण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्याचे उद्घाटन केले होते . त्यानंतर सातत्याने या मुख्यालयाकडे दुर्लक्ष होत आहे. मुख्यालय झाले तेव्हापासून पॅकेज काळात एका अधिकार्याने येथे मुक्काम ठोकला होता. पॅकेज संपल्यानंतर एकही अधिकारी मुख्यालयी थांबत नसून, ते पुणे-मुंबईहून मंडळाचा कारभार चालवत आहेत. मंडळाचे कार्यालय विदर्भात असल्याने याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या शेतकर्यांच्या प्रतिक्रिया आहेत. शेतकरी आत्महत्या इकडे आणि विमा योजना तिकडे, अशी अवस्था विदर्भाने अनुभवली आहे. हे मंडळ येथून हलविण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. राज्य, केंद्र शासनाने जेव्हा मोठे पॅकेज दिले होते तेव्हा या मुख्यालयाला आधार मिळाला होता, पण नंतर या मुख्यालयाकडे दुर्लक्ष झाले आहे. *मंडळाचे कार्यालय स्वत:च्या जागेत पशुधन विकास मंडळाचे कार्यालय आता स्वत:च्या जागेत उभारण्यात आले आहे. या ठिकाणी अधिकार्यांसाठी उत्तम व्यवस्था आहे, पण येथे मुख्य अधिकारीच राहत नसल्याचे चित्र आहे.
अकोल्यातील पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय वा-यावरच!
By admin | Published: March 20, 2015 12:24 AM