अकोला : जिल्ह्याच्या तापमानात घट पहायला मिळाली. शुक्रवारी पारा ४०.७ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेला. सोमवारी उच्चांक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. ढगाळ वातावरणामुळे ही घट झाली असल्याचा अंदाज आहे.
------------------------------------------------
संत्रा ९०० रुपये कॅरेट
अकोला : उन्हाळा सुरू असल्याने संत्र्याला मागणी आहे; परंतु बाजारात मालाची आवक नसल्याने संत्रा २०० रुपयांवरून ९०० रुपये कॅरेटवर पोहोचला आहे. संत्र्याला फळ विक्रेत्यांकडून मोठी मागणी होत आहे.
-------------------------------------------------
बसेस खिळखिळ्या
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. काही बसेसचे साहित्य उपलब्ध नसल्याने त्या आगारात नादुरुस्त आहे. त्यामुळे नवीन बसेस दाखल करण्याची मागणी होत आहे.
------------------------------------------------
सोयाबीन सहा हजारांवर
अकोला : सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे हंगाम संपल्यानंतरही सोयाबीनच्या दरात तेजी कायम आहे. शुक्रवारी सोयाबीन सहा हजारांचा टप्पा पार केला. बाजार समितीत सोयाबीनला सहा हजार १०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. या भाववाढीचा फायदा अद्याप माल विक्री न केलेल्या शेतकऱ्यांना होत आहे.