शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अकोल्याचा पारा ४२.६ अंशावर : उष्माघाताचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 2:19 PM

अकोला: जिल्ह्याचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी जिल्ह्याचे तापमान ४२.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तापमान आणखी वाढणार असल्याने उष्माघाताचा धोकाही वाढला आहे.

अकोला: जिल्ह्याचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी जिल्ह्याचे तापमान ४२.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तापमान आणखी वाढणार असल्याने उष्माघाताचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे उन्हात घराबाहेर निघणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.गत आठवड्यापासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असून, उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. रविवारी जिल्ह्याच्या तापमानाची नोंद ४२.६ अंश सेल्सिअस एवढी करण्यात आली. वाढत्या तापमानाचा परिणाम आरोग्यावर दिसू लागला असून, अनेकांना डिहायड्रेशनच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. ही परिस्थिती आरोग्यासाठी घातक असून, उष्माघाताचा धोकाही नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता नागरिकांनी उन्हापासून स्वत:चा बचाव करावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. विशेषत: या दिवसात शरीराचे तापमान कायम राखण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, असा सल्लादेखील डॉक्टरांनी दिला आहे. गरज असली तरच घराबाहेर पडावे, अन्यथा उन्हात फिरणे टाळावे. शिवाय सुदृढ आरोग्यासाठी या दिवसात संतुलित आहार घेण्याचे आवाहनदेखील डॉक्टरांनी केले आहे.गारेगार पाणी टाळाउन्हाळ््याच्या दिवसात बहुतांश लोक गारेगार पाणी प्यायला पसंती देतात; परंतु हे गारेगार पाणी आरोग्यासाठी घातकदेखील ठरू शकते. थंड पाणी पिल्यास घसा कोरडा पडतो. त्यामुळे तहान भागत नाही. म्हणून उन्हाळ््याच्या दिवसात गारेगार पाण्या ऐवजी माठातील पाणी प्यावे.किडनी स्टोनच्या रुग्णांनी भरपूर पाणी प्यावे.किडनी स्टोनची समस्या असणाऱ्यांनी नेहमीच भरपूर पाणी प्यावे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो; परंतु उन्हाळ््याच्या दिवसात अशा रुग्णांनी पाणी पिण्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तहान नसतानादेखील भरपूर पाणी प्यावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.हे करा......!

  1. भरपूर पाणी प्या
  2. व्यायाम सकाळी किंवा सूर्यास्तानंतरच करा
  3. सैल वस्त्र परिधान करा
  4. गडद रंगाचे वस्त्र टाळा
  5. शिळे अन्न खाण्यास टाळा
  6. उन्हात जड कामे टाळा
  7. संतुलित आहार घ्या

 

उन्हाळ््यात शरीराचे तापमान संतुलित राखण्याची खरी गरज असते. त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे. शिवाय, व्यायाम करणाऱ्यांनी किंवा खेळाडूंनी साधे पाणी न पिता पाण्यात चिमूटभर मीठ घेऊन प्यावे.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाHeat Strokeउष्माघातSun strokeउष्माघातSummer Specialसमर स्पेशल