अकोला : विदर्भ क्रिकेट संघटनेद्वारा आयोजित विदर्भातील प्रतिष्ठित समजली जाणारी स्व. विजय तेलंग स्मुर्ती क्रिकेट स्पर्धा चंद्रपूर येथे संपन्न झाली. या स्पर्धेत अंतिम फेरीत अकोला जिल्हा संघाने यजमान चंद्रपूरचा पराभव करीत विजय ट्रॉफीवर नाव कोरले. अंतिम सामन्यात चंद्रपूरचा संघ २६.५ पटकांत अवघ्या ९९ धावांत संपुष्टात आल्यानंतर, अकोल्याच्या फलंदाजांनी केवळ १३ षटकामध्ये आवश्यक धावा ठोकून केवळ एक गडी गमावून करंडक उंचावला. उपांत्य फेरीत अमरावतीचा १२३ धावांनी पराभव करणाऱ्या अकोल्याने अंतिम फेरीत आपले नाव पक्के केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी चंद्रपूरला खिळवून ठेवला.
आकाश राऊतने पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स घेत अकोल्याच्या नेतृत्व केले. चंद्रपूर संघाची सुरुवात निराशाजनक राहिली. चंद्रपूरच्या अवघ्या १४ धावां ३ विकेटस गेल्या होत्या. ठराविक अंतराने विकेट्स घेत अकोल्याच्या गोलंदाजांचे दडपण कमी झाले नाही. सिद्धांत मुळे याने अंतिम फेरीत १२ धावांमध्य ३ बळी घेत चंद्रपूरची संख्या तीन आकड्यांवर पोहोचू दिली नाही.चंद्रपुरच्या संघाला ९९ धावाच करता आल्या.
त्याच्या प्रत्युत्तरात अकोलाचे सलामीवीर अहान जोशी आणि वैभव लांडे यांनी उत्कृष्ट पार्टनशिप करीत १०.२ षटकांत ८३ धावा जोडून धडाकेबाज सुरुवात केली. वैभवने ३३ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावा केल्या. आहान जोशी हा २३ धावांवर तर आर्यन मेश्राम १४ धावांवर नाबाद राहिला. अकोल्याच्या संघाने एकतर्फी विजय मिळवित ट्रॉफीवर नाव कोरले, अशी माहिती जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी दिली.