अकोला : ढगाळ वातावरणामुळे मागील चार दिवसांपासून तापमानात चढ-उतार सुरू आहे. मंगळवारी जिल्ह्याचे तापमान ४२.१ अंश सेल्सिअश नोंदविल्या गेले. हे विदर्भातील सर्वाधिक तापमान होते. सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात सरी बरसल्या. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.-----------------------------------------------
बाजार समितीत तुरीला ७,३०० दर
अकोला : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी आवक सुरूच होती. तुरीला जास्तीत जास्त ७ हजार ३०० रुपये तर सरासरी ७ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. बाजार समितीत १ हजार १९६ क्विंटल तुरीची आवक झाली. तुरीला दर चांगले मिळत असल्याने ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत माल विकला नाही, त्यांना फायदा होत आहे.
------------------------------------------------
शेतकऱ्यांमध्ये पुन्हा अवकाळीची धास्ती!
अकोला : मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. मार्च महिन्यात अवकाळीमुळे पिकांना फटका बसला. आता उन्हाळी पिकांवर संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यात ४ हजार ३६९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी पिकांची पेरणी केली आहे.
--------------------------------------------------