लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यातील निसर्गप्रेमी उत्कर्ष जैन नामक युवकाने १ हजार इकोफ्रेन्डली पेन्सिल, सीड्सबॉल पेनची निर्मिती करून अनोखा विक्रम नोंदविला आहे. जैन यांनी बनविलेल्या इकोफ्रेन्डली पर्सनलाईज १ हजार पेन्सिल निर्मितीची दखल इंडिया बुक रेकॉर्डने घेतली असून, त्यांच्या विक्रमाची नोंद रेकॉर्डला घेतली आहे.उत्कर्ष जैन हे व्यावसायिक असून, निसर्गप्रेमी म्हणूनही ते ओळखले जातात. बºयाच पेन, पेन्सिलचा वापर केल्यानंतर आपण त्या कचºयात फेकून देतो. त्यामुळे कचरा साचतो; परंतु जैन यांनी, इकोफ्रेन्डली पेन्सिल आणि सीड्सबॉल पेनची निर्मिती केली. पर्यावरणाचे संतुलन राखावे आणि शालेय मुलांमध्ये वृक्ष लागवड व संवर्धनाचा संदेश जावा, यासाठी त्यांनी सीड्सबॉलची पेनची निर्मिती केली. सीड्सबॉल पेनमध्ये विविध प्रकारच्या वृक्षांच्या बियांचा वापर त्यांनी केला. पेनचा वापर केल्यानंतर हा पेन खुल्या जागेवर, कुंडीत लावल्यास, त्यातून रोपाची उगवण होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी १ हजार इकोफ्रेन्डली पर्सनलाईज पेन्सिल तयार केल्या. त्यांच्या कार्याची इंडिया बुक रेकॉर्डने दखल घेतली आणि त्यांचा हा विक्रम आपल्या रेकॉर्डला नोंदविला. जैन यांच्या या पर्यावरणपूरक प्रकल्पाची इस्त्रो (इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन) आणि पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आणि त्यांचे कौतुकसुद्धा केले. जैन यांनी मतदान जनजागृती, स्वच्छता, योगा, पर्यावरण, वृक्षसंवर्धन, गोमाता, तंबाखूमुक्ती, रस्ते सुरक्षा, नमो पेन्सिल, चंद्रयान मोहीम, रक्तदान, नेत्रदान यासोबतच आचार्य विद्यासागर महाराज यांच्या ५00 हायस्कूल विचारांच्या पेन्सिलचीसुद्धा त्यांनी निर्मिती केली आहे. बालदिनानिमित्त त्यांनी अल्फाबेट, मराठी मुळाक्षर, पाढे, अॅनिमल सीरिज, फ्रूट, फ्लॉवर आदी विषयांच्यासुद्धा पेन्सिलची निर्मिती केली आहे.
एक हजार इकोफ्रेन्डली पेन्सिल बनविणाऱ्या युवकाची इंडिया बुक रेकॉर्डने घेतली दखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 1:42 PM