अकोला - जागतीक कुराश दिनाचे औचीत्य साधून उझबेकीस्तान येथे आयोजीत करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी खुल्या वजन गटात पहेलवान विदर्भ केसरी युवराज गावंडे यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाकडून युवराज गावंडे कुराश स्पर्धेत खेळणार असून ६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत कुराश स्पर्धा उझबेकीस्तान येथे खेळल्या जाणार आहेत.उझबेकीस्तानची राजधानी ताश्कंद येथे जागतीक कुराश दिनाचे औचीत्य साधून आंतरराष्ट्रीय कुराश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी खुल्या वजन गटात अकोल्यातील पहेलवान विदर्भ केसरी युवराज गुलाबराव गावंडे यांची निवड करण्यात आली आहे. युवराजने यापुर्वी सुध्दा राष्ट्रीय व राज्य पातळीवर कुराश क्रीडा प्रकारात चमकदार कामगीरी केली आहे. जकार्ता इंडोनेशीया येथे पार पडलेल्या आशीयाई स्पर्धेचे यशस्वी निरीक्षक म्हणूण जोरदार कामगीरी पार पाडल्यानंतर येथून परत येताच युवराज गावंडे यांची उझबेकीस्तान येथे होणाऱ्या आंततराष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी खुल्या वजन गटात निवड करण्यात आली आहे. विदर्भ केसरी युवराज गावंडे भारतीय संघासोबत बुधवारी सायंकाळी दिल्ली येथून रवाणा होणार आहेत. गत तीन वर्षापासुन आंतरराष्ट्रीय पदक विजेते व महाराष्ट्र कुराश फेडरेशनचे अध्यक्ष योगेश उंटवाल यांच्या मार्गदर्शनात पहेलवान युवराज गावंडे कुराश क्रीडा प्रकाराचे तांत्रीक ज्ञान आत्मसात करीत आहेत. युवराज गावंडे यांची आंतरराष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती पुणे येथील महाराष्ट्र राज्य कुराश संघटनेचे सचिव शिवाजी साळुंखे यांनी दिली. युवराज गावंडे यांच्या निवडीसाठी भारतीय कुराश महासंघाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री जगदीश टायटलर व महासचिव रवि कपुर यांनी प्रयत्न केले.
अकोल्याच्या युवराव गावंडेची आंतरराष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 12:24 PM
अकोला - जागतीक कुराश दिनाचे औचीत्य साधून उझबेकीस्तान येथे आयोजीत करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी खुल्या वजन गटात पहेलवान विदर्भ केसरी युवराज गावंडे यांची निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्देउझबेकीस्तानची राजधानी ताश्कंद येथे जागतीक कुराश दिनाचे औचीत्य साधून आंतरराष्ट्रीय कुराश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खुल्या वजन गटात अकोल्यातील पहेलवान विदर्भ केसरी युवराज गुलाबराव गावंडे यांची निवड करण्यात आली आहे.