संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत जिल्हय़ात ३ हजार ५00 शेततळी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असले तरी, गत ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्हय़ात केवळ ६४८ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली आली आहेत. त्यामुळे जिल्हय़ात शेततळी कामांचा बोजवारा उडाल्याची बाब समोर येत आहे. त्यानुषंगाने शेततळ्यांच्या कामांसाठी शेतकर्यांना प्रोत्साहित करण्याच्या कामात दिरंगाई करणार्या अकोला तालुक्यातील ९ महसूल मंडळ अधिकारी आणि ३ कृषी मंडळ अधिकार्यांना तहसीलदारांनी १0 नोव्हेंबर रोजी कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीस बजावली आहे.शासनामार्फत राबविण्यात येणार्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत सन २0१६-१७ व २0१७-१८ या दोन वर्षात जिल्हय़ात ३ हजार ५00 शेततळी करण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यानुषंगाने गत ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्हय़ात शेततळ्यांच्या कामांसाठी २ हजार ९६५ शेतकर्यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज प्राप्त झाले आहेत. उद्दिष्टाच्या तुलनेत गत वर्षभराच्या कालावधीत जिल्हय़ात केवळ ६४८ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित शेततळ्यांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे उद्दिष्टाच्या तुलनेत शेततळ्यांच्या कामांसाठी शेतकर्यांकडून ऑनलाइन अर्ज प्राप्त होणार की नाही आणि शेततळ्यांच्या कामांचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पृष्ठभूमीवर शेततळ्यांच्या कामांसाठी अर्ज भरण्याकरिता शेतकर्यांना प्रोत्साहित करण्याच्या सूचना अकोला उपविभागीय अधिकार्यांकडून तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायकांना देण्यात आल्या होत्या; परंत यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल अद्याप सादर केला नसल्याने, शेततळ्यांच्या कामात दिरंगाई करणार्या तालुक्यातील ९ महसूल मंडळ अधिकारी व ३ कृषी मंडळ अधिकार्यांना अकोला तहसीलदारांनी १0 नोव्हेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शेततळ्यांसाठी शेतकर्यांच्या अर्जाची यादी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आणि स्पष्टीकरण तातडीने सादर करण्याचे निर्देशही नोटीसमध्ये देण्यात आले.
जिल्हय़ातील शेततळ्यांच्या कामांवर दृष्टिक्षेप!२0१६-१७ व २0१७-१८ मध्ये शेततळ्यांचे उद्दिष्ट : ३५00शेतकर्यांकडून ऑनलाइन प्राप्त अर्ज : २९६५कार्यारंभ आदेश दिलेली कामे : १५१८पूर्ण करण्यात आलेली कामे : ६४८अनुदान वाटप करण्यात आलेले शेतकरी : ६३२अनुदान वाटपापोटी खर्च झालेला निधी : २.९५ कोटी
शेततळ्यांच्या कामांसाठी अर्ज भरण्याकरिता शेतकर्यांना प्रोत्साहित करण्याच्या कामात दुर्लक्ष करणार्या अकोला तालुक्यातील ९ महसूल मंडळ अधिकारी आणि ३ कृषी मंडळ अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, तातडीने स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.- राजेश्वर हांडे, तहसीलदार, अकोला.