लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सायक्लोन आय एम ए, बधिरीकरण शास्त्र तज्ञ परिषद शाखा अकोला, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय आणि युथ होस्टेल यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल संदर्भात जनजागृती व्हावी ह्या उद्देशाने आज अँटलस सायक्लोन सायकल रॅली सोत्साहात संपन्न झाली. विविध स्तरांतील शेकडो सायकलस्वारांनी सहभाग नोंदवून समाजाला निरोगी आरोग्याचा मंत्र दिला. आज सकाळी ठिक ७.३0 वाजता ह्या रॅलीला प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय े ट्रायथलॉन डॉ. अमित सर्मथ यांनी आय एम ए हॉल पासून हिरवी झाडी दाखवून सुरूवात केली. हि रॅली ठरल्यानुसार गोरक्षण रोड, कौलखेड, जिल्हाधिकारी कार्यालय मागार्ने जाऊन वसंत देसाई स्टेडियम मधे झाली. स्टेडियम मधील रंगारंग कार्यक्रमात अँटलस सायक्लोन २0१७ चे डायरेक्टर डॉ. राजेंद्र सोनोने यांनी स्वत:ला आणि येणा-या पिढींना निरोगी वातावरण देण्यासाठी झिरो एमिशन असलेल्या सायकलचा वापर दैनंदिन जीवनात करण्याचे सर्व उपस्थितांना आवाहन केले. प्रमुख अतिथी डॉ. अमित सर्मथ यांनी येणा-या काळात आपल्याला जबरदस्तीने सायकल चालवावी लागेल, आपल्यासमोर दुसरा पर्यायच नसेल, तर मग आजच सायकलला आनंदाने का नाही स्विकारायचे असा मोलाचा सल्ला सर्वांना दिला. तसेच ५ लक्ष लोकसंख्येच्या अकोलासारख्या शहरात अश्या रॅली मधे साधारण १0 हजार नागरीकांचा सहभाग असायला हवा मात्र तो तेवढा नसल्याची खंतही व्यक्त केली. अकोलेकरांना सायकल ह्या खेळाच्या क्षेत्रात जी काही मदत हवी असेल ती त्यांच्या प्रोहेल्थ फाऊंडेशन नागपूर तर्फे सहर्ष देण्याचा मानस ही त्यांनी व्यक्त केला. जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी शाळांमधून खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन सतत प्रयत्न करीत असुन त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत असे सांगितले. आय एम ए चे अध्यक्ष डॉ. पुरूषोत्तम तायडे यांनी आय एम ए सतत समाजोपयोगी उपक्रम राबवित असून सायकल रॅली हा त्यातीलच एक भाग असल्याचे सांगितले शारदा एजन्सिजचे मल्होत्रा यांनी ह्या गरीबांच्या वाहनांवरील १२टक्के जिएसटी सरकारने शुन्य करावा अशी शासनाला विनंती केली. आजच्या रॅलीला विशेष आमंत्रित एक हात आणि पाय अपघातात गमावलेले तरीही मनात जिद्द बाळगुन विविध शिखरांवर यशस्वी चढाई करणारे अकोट ये थील श्री. धिरज कळसाईत यांनी संपूर्ण रॅली मधे सायकल चालवून समाजासमोर आदर्श निर्माण केला. त्यांच्या जिद्दीला बघून डॉ. अंजली सोनोने यांनी ५ हजार रुपयांचा धनादेश देवून त्यांना वैयक्तिकरित्या गौरवान्वित केले. आभारप्रदर्शन आय एम ए चे सचिव डॉ. रणजित देशमुख यांनी केले. सरतेशेवटी भाग्यवंतांचा ड्रॉ प्रमुख अतिथींच्या हस्ते काढण्यात आला. पुरूष गटात विकास महादेव ठाकरे, महिला गटात कोमल गवारगुरू आणि बालक गटात नकुल जोशी या भाग्यवंतांना सायकल बक्षिस देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रविण देशमुख यांनी केले.
‘सायकल चालवा-पर्यावरण वाचवा’ संदेश दिला अकोलेकर सायकलपटूनी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 8:39 PM
अकोला : सायक्लोन आय एम ए, बधिरीकरण शास्त्र तज्ञ परिषद शाखा अकोला, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय आणि युथ होस्टेल यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल संदर्भात जनजागृती व्हावी ह्या उद्देशाने आज अँटलस सायक्लोन सायकल रॅली सोत्साहात संपन्न झाली. विविध स्तरांतील शेकडो सायकलस्वारांनी सहभाग नोंदवून समाजाला निरोगी आरोग्याचा मंत्र दिला.
ठळक मुद्दे‘आयएमए’ हॉल पासून झाली सुरूवातवसंत देसाई स्टेडियममधे झाला समारोप