शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
3
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
4
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
5
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
6
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
7
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
8
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
9
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
10
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
11
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य
12
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
13
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
14
विशेष लेख: तहव्वुर राणाला आणले, मेहुल चोक्सीचे काय? प्रत्यार्पणाचा इतिहास
15
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
16
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
17
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
18
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
19
नियमांचे उल्लंघन कराल, तर वाळू डेपो होणार रद्द; महसूल मंत्र्यांचा इशारा

‘अनंत कोटी, ब्रह्मांड नायक...’चा जयघोष! भक्तीमय वातावरणात ‘श्रीं’च्या पालखीचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 13:45 IST

दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी

अकोला : हातात भगवे ध्वज, सोबत अश्व अन् टाळ-मृदुंगाच्या गजरात ‘अनंत कोटी... ब्रह्मांड नायक... महाराजाधिराज... योगीराज... भक्त प्रतिपालक... शेगाव निवासी... समर्थ सदगुरू श्री संत गजानन महाराज की जय...,’ असा जयघाेष करत संत गजानन महाराज यांच्या पालखीसह वारकऱ्यांचे १५ जून रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास डाबकी रोडमार्गे श्री राजराजेश्वर नगरीत आगमन झाले. श्रींच्या दर्शनासाठी झालेल्या भाविकांच्या अलाेट गर्दीने फुलांचा वर्षाव करत ‘श्रीं’च्या पालखीचे स्वागत केले.

५५ वर्षांची परंपरा जपत शेगाव येथून पंढरीसाठी प्रस्थान झालेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे शनिवारी डाबकी रोडमार्गे श्री राजराजेश्वर नगरीत आगमन झाले. पहाटेपासूनच ‘श्रीं’च्या दर्शनासाठी डाबकी रोड परिसरात भाविकांची अलोट गर्दी जमली होती. ‘श्रीं’च्या आगमनासाठी पालखी मार्गाची स्वच्छता करून भाविकांनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. चौकाचौकात ‘श्रीं’च्या प्रतिमेचे पूजन आणि भक्ती गीतांनी परिसर मंत्रमुग्ध झाला होता. पालखी येताच पालखीवर फुलांचा वर्षाव करत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. डाबकीराेडवरील खंडेलवाल भवन येथे वारकऱ्यांनी दुपारी भोजन घेतले.

...असा राहील शोभायात्रेचा मार्ग१५ जून रोजी अकोला शहरातील शोभायात्रेचा मार्ग श्री गजानन महाराज संस्था प्रमुखांनी ठरवून दिलेल्या शहरातील मुख्य रस्त्यानेच शोभायात्रा निघणार आहे. सकाळी ११ वाजता श्रींचे पालखी शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय गोडबोले प्लॉट जुने शहर येथून निघून. डाबकी रोड, श्रीवास्तव चौक, विठ्ठल रुक्माई मंदिर, सिटी कोतवाली चौक, गांधी रोड, चिव चिव बाजार येथून मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगण येथे पालखीचा मुक्काम राहील. १६ जून २०२४ रोजी परतीचा मार्ग सकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी निवासमोरून, वन विभाग कार्यालय, खंडेलवाल भवन मार्गे गोरक्षण रोड, आदर्श कॉलनी शाळा क्रमांक १६ येथे दुपारी विश्रांती व महाप्रसादाचे वितरणानंतर संभाजीनगर, सिंधी कॅम्प मेन रोड,कारागृह समोरून, मेन हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय, खोलेश्वर मार्गे सिटी कोतवाली चौक, राजराजेश्वर मंदिर समोरून, हरिहर पेठमधील श्री शिवाजी विद्यालय जिल्हा परिषद टाऊन स्कूल येथे रात्रीचा मुक्काम राहील. 

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजAkolaअकोला