अकोला : अकोली खुर्द गावातील युवकाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येला एक पोलीस कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करीत युवकाच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली. यासाठी रविवारी दुपारी ग्रामस्थांनी जुने शहर पोलीस ठाण्यात धडक दिली आणि ठाणेदार अन्वर शेख यांना संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.अकोली गावातील एका युवकाने १ जुलै रोजी एका पोलीस कर्मचाºयाच्या दुचाकीस धडक दिली. यात पोलीस कर्मचाºयाच्या दुचाकीचे नुकसान झाले. घटनास्थळावर युवकाचे वडील आले. त्यांनी युवकाला घरी पाठवून दिले. पोलीस कर्मचाºयाने त्यांना नुकसानभरपाई मागितली. त्यानंतर घरी गेल्यावर वडिलांनी युवकास पोलीस कर्मचारी तीन हजार रुपये नुकसान भरपाई मागत असल्याचे सांगितले. यामुळे युवक चिंतेत पडला आणि त्याने विष प्राशन केले. त्याला सर्वोपचार रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस संबंधित पोलीस कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप मृतक युवकाचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी केला आणि कायदेशीर कारवाईसाठी जुने शहर पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी कुटुंबीय व ग्रामस्थांनी ठाणेदार अन्वर शेख यांच्यासोबत चर्चा करून योग्य कारवाई करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)त्या युवकाचे कुटुंबीय व ग्रामस्थ रविवारी दुपारी पोलीस ठाण्यात आले. त्यांनी कारवाईची मागणी केली. परंतु, त्यांनी कोणतीही तक्रार दिली नाही. तक्रार दिल्यावर आपण चौकशी करून, योग्य ती कारवाई करू.- अन्वर शेख, ठाणेदारजुने शहर पोलीस ठाणे