निवेदनात नमूद आहे की, शहरात फक्त ग्रामीण रुग्णालयातच लसीकरण सुरू असून, प्रथमिक आरोग्य केंद्र गोल बाजार आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नंदीपेठ येथे लसीकरण बंद आहे.
ग्रामीण रुग्णालय अकोट येथे अंदाजे १२५ ते १५० प्रतिबंधक लस देण्यात येते. जर दोन्ही उपकेंद्रांमध्ये जर लसीकरण सुरू केले, तर लसीकरणाला गती मिळू शकते. सध्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना गोलबाजार आणि नंदीपेठ या उपकेंद्राचे ऑप्शन मिळतात; परंतु प्रत्यक्षात मात्र तिथे गेल्यास कर्मचारी ग्रामीण रुग्णालयात पाठवतात. त्यामुळे ज्येष्ठांना नाहक त्रास होत आहे. याकडे लक्ष देऊन दोन्ही उपकेंद्रांमध्ये लसीकरण मोहीम सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना प्रहार सेवक अचल बेलसरे यांच्या नेतृत्वात रितेश हाडोळे, विशाल निचळ, शाहिद भाई, अर्पण नाथे, गिरीश ढगेकर, निखिल हाडोळे, सुशील सावरकर, निखिल झाडे, धीरज बाळे, मयूर जुनगरे, विश्वजीत दिंडोकार, भूषण नाथे, रोशन सावरकर आदी उपस्थित होते.