शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

अकोट : मेळघाटातील पुनर्वसित गावकर्‍यांनी केली जमिनीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 2:16 AM

अकोट : मेळघाटातून अकोट उपविभागात पुनर्वसन करण्यात आलेल्या आठ गावांतील ग्रामस्थांनी शेतजमिनींसह इतर मागण्यांकरिता मेळघाटमध्ये जाऊन जुन्या गावात बस्तान मांडले आहे. दरम्यान, चर्चेकरिता गेलेल्या लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकार्‍यांना पुनर्वसित गावकर्‍यांनी ई-क्लासच्या आधी जमिनी पाहू व नंतर सामूहिक निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. त्यावरून पुनर्वसित गावकर्‍यांनी अकोट  तालुक्यातील ई-क्लासच्या जमिनीची  तहसीलदार विश्‍वनाथ घुगे यांच्या उपस्थितीत पाहणी केली.

ठळक मुद्दे२६ गावांत ई-क्लासची २८0 हेक्टर जमीन उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : मेळघाटातून अकोट उपविभागात पुनर्वसन करण्यात आलेल्या आठ गावांतील ग्रामस्थांनी शेतजमिनींसह इतर मागण्यांकरिता मेळघाटमध्ये जाऊन जुन्या गावात बस्तान मांडले आहे. दरम्यान, चर्चेकरिता गेलेल्या लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकार्‍यांना पुनर्वसित गावकर्‍यांनी ई-क्लासच्या आधी जमिनी पाहू व नंतर सामूहिक निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. त्यावरून पुनर्वसित गावकर्‍यांनी अकोट  तालुक्यातील ई-क्लासच्या जमिनीची  तहसीलदार विश्‍वनाथ घुगे यांच्या उपस्थितीत पाहणी केली.मेळघाटमधून केलपाणी, गुल्लरघाट, नागरतास, बारुखेडा, सोमठाणा बु., सोमठाणा खु., अमोना, धारगड या आठ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु, वातावरण मानवत नाही, शेत जमिनी नाही. त्यामुळे हे गावकरी पुन्हा जुन्या गावी जात आहेत. जमिनी मिळाल्याशिवाय जंगलाबाहेर निघणार नसल्याची भूमिका पुनर्वसित गावकर्‍यांनी घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पुनर्वसित गावकर्‍यांना जमिनी देण्याचा आदेश काढला आहे. तो आदेश घेऊन अकोला, अमरावतीचे जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी मेळघाटात जाऊन पुनर्वसित गावकर्‍यांशी चर्चा केली. परंतु, आधी ई-क्लासच्या जमिनी पाहून आल्यानंतरच सामूहिक निर्णय घेणार असल्याचे पुनर्वसित गावकर्‍यांनी अधिकार्‍यांना सांगितले. त्यामुळे शासनाच्यावतीने त्यांना ई-क्लासच्या जमिनी पाहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार तहसीलदार विश्‍वनाथ घुगे व इतर अधिकारी, तलाठी, पटवार्‍यांसह पुनर्वसित गावकर्‍यांनी दहीखेल फुटकर या परिसरात उपलब्ध असलेल्या ई-क्लासच्या जमिनीची पाहणी केली आहे. तालुक्यातील २६ गावात ई-क्लासच्या जमिनी उपलब्ध आहेत. त्या जमिनीचे मोजमाप करण्याच्या दृष्टीने भूमी अभिलेख कार्यालयाचे सहा पथक नियुक्त केले आहेत. तालुक्यात दहीखेल फुटकर, दिवठाणा, रामटेक, केळीवेळी, धामणगाव, रामापूर, धारुर, बोचरा, रुधाडी, हनवाडी, खासबाग, राहणापूर, कुटासा, करतवाडी, कावसा, मरोडा,  तांदूळवाडी, चोरवड खु., खैरखेड बु., हिलालाबाद, शहापूर, नांदखेड,  कवठा खु., लामकाणी, खिरकुंड खुर्द, बळेगाव आदी गावांत २८0 हेक्टर ई-क्लासची जमिन उपलब्ध आहे. ही जमीन पुनर्वसित गावकर्‍यांना दाखविल्यानंतर ती पेरणीयोग्य आहे किंवा काय आदी बाबतचा आढावा घेऊन पुनर्वसित गावकरी सामूहिक निर्णय घेणार असल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, मेळघाटमध्ये ठाण मांडून बसलेल्या पुनर्वसित गावकरी व वन विभागामध्ये संघर्ष पेटला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशा स्थितीत  शासन पुनर्वसित गावकर्‍यांच्या समस्या कधी व कशाप्रकारे निकाली काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Melghatमेळघाटakotअकोट