अकाेला : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाकारले आहे. हे आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द होऊन नाकारण्यात आले आहे. याचा निषेध करण्यासाठी ३ जून रोजी संपूर्ण राज्यात भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चातर्फे राज्यव्यापी ‘आक्रोश आंदोलन’ करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अकाेल्यात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भाजपच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाचे समाजासाठी संघर्ष करणारे लोकनेते, आधारस्तंभ गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांना अभिवादन करून आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात, किशोर पाटील, महापौर अर्चनाताई मसने यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून राज्य सरकार व महाविकास आघाडीला इशारा देण्यात आला. या वेळी ओबीसी आघाडीचे अध्यक्ष जयंत मसने व रवी गावंडे, अक्षय गंगाखेडकर, सुभाष सिंग ठाकूर, सागर शेगोकार, अजय शर्मा, संजय तिकांडे, संजय गोडफोडे, अमोल गीते, महेंद्र राजपूत, कृष्णकुमार पांडे, देवाशिष काकड आदी उपस्थित हाेते. या वेळी आ. सावरकर यांनी सांगितले की, ओबीसी समाजाला व मराठा समाजाला तसेच धनगर समाजाला न्याय मिळेपर्यंत भारतीय जनता पक्ष लढा सुरू ठेवेल. या वेळी भाजपच्या वतीने एक निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी संजय खडसे यांना देण्यात आले.
भाजपतर्फे अकाेल्यात आक्रोश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 7:19 PM