नीलिमा श्ािंगणे-जगड
अकोला: आगामी आशियाई आणि आॅलिम्पिक स्पर्धेत देशाचा तिरंगा फडकविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सज्ज झाले आहे. यासाठी पात्र खेळाडूंची निवड करू न त्यांच्या खेळ सरावात कुठलाही अडथळा येवू नये,याकरिता खेळाडूंना शासनाने शिष्यवृत्ती जाहिर केली आहे. यामध्ये अकोल्याचा फुटबॉलपटू अब्दुल सुफीयान अब्दुल फहिम शेख याची निवड झाली आहे. पुढील पाच वर्षाकरिता पाच लक्ष रू पयांची शिष्यवृत्ती सुफीयानला मिळणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्रातील केवळ दोन फुटबॉलपटू पात्र ठरले आहेत. अकोल्याचा अब्दुल सुफियान आणि नांदेडचा तुषार देसाई. सुफियानची निवड खेलो इंडियाकरिता महाराष्ट्र फुटबॉल संघात झाली होती. निवड झालेला अकोल्यातील सुफीयान एकमेव फुटबॉलपटू ठरला. पहिल्या सामन्यात सुफियानने ओरिसा आणि उपान्त्य सामन्यात पंजाब विरू ध्द एक गोल केला. परंतू दुर्दवाने महाराष्ट्राला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. तिसºया स्थानासाठी महाराष्ट्राचा सामना केरळ सोबत झाला. यामध्ये देखील सुफियानने महत्वपूर्ण गोल करू न महाराष्ट्राला आघाडी मिळवून दिली. महाराष्ट्राने हा सामना २-१ ने जिंकून तिसरेस्थान प्राप्त केले. या स्पर्धेत सुफियानने उत्कृष्ट खेळप्रदर्शन केल्यामुळे त्याची निवड इंडिया कॅम्पसाठी करण्यात आली. तसेच पुढील पाच वर्षांसाठी पाच लक्ष रू पयांची शिष्यवृत्ती सुफियानला मिळणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्रातील केवळ दोन फुटबॉलपटू पात्र ठरले. द्वितीय खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ मध्ये २२७ पदके प्राप्त करून महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरला आहे. खेळाडूंच्या गुणवत्ता उंचावण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने सुवर्ण पदक विजेत्यांना एक लाख रुपए, रौप्य पदक विजेत्यांना ७५ हजार तर कास्य पदक विजेत्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे, अशी घोषणा आज क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी केली. या पारितोषिकाचा देखील सुफियान मानकरी ठरला. गुरू वारी सुफियानचा शिक्षण व क्रीडा राज्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. सुफियान हा बालेवाडी पुणे येथे प्रशिक्षक धीरज मिश्रा यांच्या मार्गदर्शनात फुटबॉलचे धडे गिरवित आहे. सुफियानचे आजोबा शेख चांद संतोष ट्राफी खेळणारे अकोल्यातील पहिले खेळाडू आहेत. वडिल अब्दुल फहिम अकोला पोलिस विभागातील राष्ट्रीय फुटबॉलपटू आहेत. सुफियान हा शेख घराण्याचाच नव्हेतर अकोल्याचा गौरवशाली फुटबॉल वारसा पुढे चालवित आहे.