अकोला : जिल्हा दूध संघाने पुरवठा केलेल्या दुधात अल्कोहोल आढळल्याच्या सबबीखाली शासकीय दूध योजनेने गत दोन दिवसांपासून दूध घेण्याचे नाकारल्याने संघाला दूध पुरवठा करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. दरम्यान, अल्कोहोलिक दूध पश्चिम महाराष्टÑातील ‘वारणा’ योजनेकडे पाठविण्याचा सल्ला प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी संघाला दिला आहे.अकोला शासकीय दूध योजनेकडे सध्या बुलडाणा दूध संघ पातुर्डा येथील १६० लीटर, चिखली दूध शीतकरण केंद्राचे २,३९७ तर मूर्तिजापूूर शीतकरण केंद्रातून १,५२० लीटर मिळून ४ हजार ७७ लीटर दुधाचा पुरवठा अकोला जिल्हा शासकीय दूध योजनेला केला जातो. शासकीय दूध योजनेकडे सध्या मनुष्यळाची वानवा असल्याने दूध प्रक्रि येचे काम २ ते १० एकाच पाळीत सुरू आहे. पूर्णवेळ काम होत नसल्याने योजनेत पाठविण्यासाठीचे ताजे आणि काही तास ठेवलेले दूध एकत्र केल्यास त्या दुधात अल्कोहोलाचे प्रमाण वाढते. ही भेसळ नसते; परंतु चाचणीत दोन टक्के अल्कोहोल यामध्ये आढळून येते. अल्कोहोलिक दूध शासकीय योजना घेत नसल्याने दोन दिवसांपासून हे दूध घेतले जात नसल्याचे समोर आले आहे.दरम्यान, हे दूध पश्चिम महाराष्टÑातील ‘वारणा’ दूध योजनेला सहाशे किलोमीटर दूर पाठविण्याचा सल्ला प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी दूध संघाला दिला आहे; पण येथेच जर दुधात अल्कोहोल आढळत असेल, तर वारणा नेऊनही आढळेलच, मग एवढा खर्च करू न दूध परत आणावे लागणार आहे. बिकट परिस्थितीत जिल्हा संघाला दूध पुरवठा करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यासंदर्भात अद्याप शासनाचे दिशा-निर्देश दूध योजनेला प्राप्त झाले नसल्याने शेतकºयांचे याकडे लक्ष लागले आहे.
- भंडाऱ्याची योजना बंदअकोल्याच्या शासकीय दूध योजनेचे दूध एप्रिलपासून भंडारा येथे बटर व दूध भुकटी बनविण्यासाठी पाठविण्यात येत होती. या दुधाची तेथे उत्पादने तयार केली; पण शासनाने ही उत्पादने उचललीच नसून, भुकटी, बटर उत्पादने वाहतुकीसाठीची निविदाही अद्याप काढली नसल्याचे वृत्त आहे. या परिस्थितीमुळे भंडारा दूध योजनेला शासनाकडून मिळणारे ३६ लाखांच्यावर देयक थकली आहेत. परिणामी, अकोला योजनेचे दूध भंडाºयाला पाठविणे बंद आहे. त्याचाच हा परिणाम पश्चिम वºहाडातील शेतकºयांना सोसावा लागत असल्याचे दूध उत्पादक शेतकºयांचे म्हणणे आहे.
- दूध चाचणीत दोन टक्के अल्कोहोल आढळत असल्याने चार हजार लीटरवर दूध स्वीकारणे बंद केले आहे. वाशिम संघाच्या पावत्या फाडल्या होत्या, त्यामुळे ते दूध मंगळवारी घेतले. एक-दोन दिवसांत यासंदर्भात तोडगा निघण्याची शक्यता आहे. वारणा योजनेला दूध नेण्याचा सल्ला दिला असला, तरी तेथेही याच समस्येला सामोरे जावे लागणार असल्याने तेथे दूध पाठविण्याचा तूर्तास कोणताही विचार नाही.एन. एस. कदम,प्रभारी दुग्ध शाळा व्यवस्थापक,शासकीय दूध योजना, अकोला.