अकोला : शहरातील महत्वाच्या मार्गांपैकी एक असलेल्या गोरक्षण मार्गावर स्थलांतरीत करण्यात आलेले दारु दुकान हटविण्याच्या मागणीसाठी परिसरातील व्यापारी व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी आंदोलन केले.राज्य व राष्ट्रीय महागार्पासून पाचशे मीटर अंतराच्या आत असलेली दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या आदेशामुळे शहरातील अनेक दारूची दुकाने बंद झाली. ही दुकाने राज्य व राष्ट्रीय महामागार्पासून लांब स्थलांतरीत करण्याचा सपाटा मद्य सम्राटांनी सुरू केला.प्रशासनाशी संगमत करुन महानगरातील गौरक्षण मार्गावर अनेक मद्यसम्राटांनी आपली दुकाने थाटली. यासाठी महापालिका प्रशासनाची परवानगी न घेताच काहींनी अनधिकृत इमारतींमध्ये दुकाने सुरू केली आहेत.त्यामुळे रस्त्यावर मद्यपींची दुकानासमोर मोठी गर्दी होत असून त्यांची वाहने रस्त्यावरच उभी करण्यात येत असल्याने या मार्गावर ये-जा करणाऱ्या महिला, युवती, विद्याथीर्नींसह आबालवृद्धांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावरील दारू विक्रीची दुकाने बंद करण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी अभियानही राबविण्यात आले होते. परंतु, याची दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे परिसरात व्यापार बंदची हाक देण्यात आली. गुरूवारी संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले, मनसेचे महानगराध्यक्ष पंकज साबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय गावंडे, निशीकांत बडगे, योगेश थोरात, वैभव तायडे, ओंकार शुक्ला, विनायक पवार, प्रवीण देशमुख, रवी खडसे, कमल खंडेलवाल, अजय दानेकर,रवी जोशी,प्रशांत प्रधान, मनीष राठोड,हर्षल भोम्बळे,बाळ काळणे,रोहित सरोदे,भैया खाडे, अजिंक्य गांवडे,वैभव तायडे, यांनी दारु दुकानांवर धडक देत दुकाने तातडीने बंद करण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोनकर्त्यांना ताब्यात घेतले.
गोरक्षण रोडवरील दारुदुकानाविरुद्ध व्यापाºयांचा एल्गार
By admin | Published: May 04, 2017 7:29 PM