शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

बडतर्फ शिक्षकाला मिळत आहेत वेतनासह सर्वच लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 3:32 PM

जिल्हा परिषदेकडून बडतर्फीचा आदेश मिळाला नसल्याचे सांगत त्या शिक्षकाला तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत चिपी गायरान शाळेत कार्यरत ठेवण्याचा प्रताप शिक्षण विभागात सुरू आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र नसल्याने आॅक्टोबर २०१७ मध्ये बडतर्फ केलेल्या शिक्षकाला गेल्या तीन वर्षांपासून सातव्या आयोगाच्या वेतनासह इतर भत्ते दिल्या जात आहेत. जिल्हा परिषदेकडून बडतर्फीचा आदेश मिळाला नसल्याचे सांगत त्या शिक्षकाला तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत चिपी गायरान शाळेत कार्यरत ठेवण्याचा प्रताप शिक्षण विभागात सुरू आहे.जिल्हा परिषदेतील शिक्षकांची बिंदू नामावली अंतिम करण्याला जातवैधता प्रमाणपत्र नसलेले, पद रिक्त नसताना आंतरजिल्हा बदलीने आलेल्यांना पदस्थापना दिल्यामुळे मोठा अडथळा निर्माण झाला होता. शिक्षण विभागातील राखीव जागांवर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना जातवैधता सादर करण्याचा आदेश देण्यात आला. जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १६ आॅक्टोबर २०१७ रोजी बडतर्फ केले. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या काही शिक्षकांना जानेवारी २०१८ मध्ये मूळ जिल्ह्यात परत पाठवण्यात आले. त्यावेळी निमशिक्षक दर्जाच्या पाच शिक्षकांनाही बडतर्फ करण्यात आले. त्यामध्ये अनुसूचित जमातींचे श्याम बापू खोटरे, रमेश नारायण मावसकर, तर इतर मागासप्रवर्गातील महादेव नागोराव ढोले, नीलेश नारायण भारसाकळे, मनोज प्रभाकर महल्ले यांचा समावेश होता. या शिक्षकांची सद्यस्थिती काय आहे, याची कोणतीही माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात उपलब्ध नाही. त्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे का, ते कार्यरत आहेत का, यासंदर्भात कुणीही माहिती देऊ शकले नाही.बडतर्फ झालेल्यांपैकी रमेश मावसकर तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत चिपी गायरान जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. त्यांना नियमित शिक्षकाचा दर्जाही प्राप्त आहे. तसेच सातव्या वेतन आयोगासह इतरही लाभ त्यांना दिले जात आहेत. तर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या लेखी ते बडतर्फ आहेत. या प्रकाराने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात किती चमत्कार घडत आहेत, याचा अंदाज न लावलेलाच बरा. एका शिक्षकाचा आदेश पंचायत समितीमध्ये पोहोचला नाही. इतर शिक्षकांबाबत काय घडले असेल, हे आता चौकशीतच पुढे येणार आहे. - अर्थ विभागाच्याही डुलक्याबडतर्फीच्या आदेशाची प्रत अर्थ विभागालाही दिली जाते. विविध प्रकरणात अडवणुकीचे धोरण अवलंबणाºया अर्थ विभागाकडून या शिक्षकाचे वेतन कसे अदा केले जात आहे, हा संशोधनाचा विषय झाला आहे. या प्रकरणात शासन निधीचा अपहार होत असल्याने सर्वसंबंधितांची चौकशी केल्यास इतरही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

चिपी गायरान शाळेत संबंधित शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेकडून बडतर्फीचा आदेश अद्यापपर्यंत मिळालेला नाही. त्या आदेशाबाबत ऐकीव माहिती आहे. संबंधित शिक्षकाला सर्व लाभ दिले जात आहेत.

- दिनेश दुतंडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, तेल्हारा.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षकAkola ZPअकोला जिल्हा परिषद