शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

ग्रामस्थांना मारहाण करणाऱ्या चारही आरोपींना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 4:58 PM

रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

अकोला : कोरोनामुळे देशभर ‘लॉकडाउन’ असताना दहीगाव, सांगळूद, धोतर्डी, आपातापा परिसरातील ग्रामस्थांना पोलीस असल्याचे सांगून, रात्री विनाकारण मारहाण करणाºया कुख्यात गुंड अज्जू ठाकूर व किरण पांडे या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी अटक करून त्यांची वरात काढल्यानंतर या टोळीतील दीपक अघर्ते व कुणाल ठाकूर या दोघांना बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पीएसआय संतोष अघाव यांनी शनिवारी अटक केली. या चारही आरोपींंविरुद्ध बोरगाव मंजू पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास करताना या आरोपींना अटक केली होती. त्यानंतर या आरोपींना बोरगाव मंजू पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी चारही आरोपींना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.जठारपेठ परिसरातील रहिवासी अज्जू ठाकूर तसेच किरण पांडे यांच्यासह दीपक अघर्ते आणि कुणाल ठाकूर हे गुंड प्रवृत्तीचे युवक ग्रामीण भागातील निरपराध ग्रामस्थांना विनाकारण मारहाण करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ व पोलिसांना मिळाली; मात्र पोलिसांच्या हातात हे गुंड लागत नसल्याने पोलिसांनी ग्रामस्थांनाच जागरूक करीत त्यांचे व्हिडिओ तसेच छायाचित्र काढण्यास सांगितले. यावरून अज्जू ठाकूर, किरण पांडे, दीपक अघर्ते आणि कुणाल ठाकूर हे चार जण तीन दिवसांपूर्वी धोतर्डी तसेच सांगळूद येथील ग्रामस्थांना पोलीस असल्याचे सांगत मारहाण करण्यासाठी जाताच येथील ग्रामस्थांनी त्यांना पकडले व पोलिसांना माहिती दिली; मात्र काही वेळातच ते पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणाची तक्रार बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात झाल्यानंतर पोलिसांनी या टोळीविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास सुरू केला.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ व त्यांच्या पथकाने शनिवारी अज्जू ठाकूर, किरण पांडे या आरोपींना अटक करून त्यांची वरात काढून सामान्यांमध्ये असलेली भीती संपविण्याचे काम केले. त्यानंतर बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पीएसआय संतोष आघाव यांनी दीपक अघर्ते आणि कुणाल ठाकूर या दोन आरोपींना अटक केल्यानंतर चारही आरोपींना बोरगाव मंजू पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चारही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी