अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून अकोला जिल्ह्यातील चारही विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजपची पहिली यादी बुधवारी जारी करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट व मुतीर्जापूर या मतदारसंघामध्ये अनुक्रमे रणधीर सावरकर, गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे व हरिष पिंपळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.अकोला पश्चिम मतदारसंघात गोवर्धन शर्मा हे सलग पाचवेळा निवडुन आले असून, यावेळी त्यांना सहाव्यांदा संधी देण्यात आली आहे. अकोला पूर्व मतदारसंघात २०१४ मध्ये पहिल्यांदा निवडूण आलेल्या रणधीर सावरकर यांना यावेळी दुसरी संधी मिळाली आहे.अकोट मतदारसंघात प्रकाश भारसाकळे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर मुतीर्जापूर मतदारसंघात यावेळी तिकीट निश्चित नसलेल्या आमदार हरीश पिंपळे यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे.
अकोल्यात भाजपच्या चारही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 1:53 PM