अकोला : उस्मानाबाद येथे येत्या १०, ११ व १२ जानेवारी रोजी होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अकोला जिल्ह्यातील सारस्वतांची मांदियाळी आहे.
दि.१० जानेवारी रोजी मुंबईतील सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा यांचे अध्यक्षतेखाली होणा-या निमंत्रितांच्या कविसंमेलनात अकोल्याचे कवी डॉ.विनय दांदळे यांचा सहभाग राहणार आहे. दि.११ जानेवारी रोजी 'आजचे भरमसाठ कवितालेखन: बाळसं की सूज?' या विषयावर डॉ. सुषमा करोगल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित परिसंवादामध्ये श्रीमती सीमा शेटे-रोठे ह्या सहभागी होणार असून दि.१२ जानेवारीला आयोजित परिसंवादात मूर्तिजापूरचे प्राचार्य व सुप्रसिद्ध समीक्षक डॉ.श्रीकांत तिडके हे 'आजचे सामाजिक वास्तव आणि मराठी लेखक' ह्या विषयावर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडतील. यावर्षीच्या ९३ वे अ.भा.मराठी साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सन्माननीय सदस्य म्हणून डॉ.गजानन नारे हे व्यासपीठावर उपस्थित राहतील.