शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

पारस प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी आज होणार सर्वपक्षीय सभा!

By admin | Published: July 17, 2017 3:16 AM

विविध संघटनांचाही राहणार सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : पारस येथील औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी ६६० मेगावॅट क्षमतेचा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प पारस येथेच सुरू करावा, या मागणीने आता जनमानसात चांगलाच जोर धरला आहे. या मागणीला पारस परिसरातील नागरिकांचा जोरदार पाठिंबा असल्याने या प्रकल्पाच्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी पारस येथे १७ जुलैच्या सायंकाळी ४ वाजता सर्व पक्षीय सुशिक्षित बेरोजगार, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कंत्राटदार संघटना, शेतकरी अभियंता संघटना , संघर्ष समिती, सुशिक्षित बेरोजगार संघटना आदींच्यावतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे.पारस येथे ६६० मेगावॅट क्षमतेचा विद्युत निर्मिती प्रकल्प व्हावा, यासाठीचा लढा ही पारसच्या अस्तित्वाची लढाई असल्याने सर्व राजकीय मतभेद बाजूला सारून पारस येथे ६६० मेगावॅटचा प्रकल्प झालाच पाहिजे, ही भूमिका घेऊन या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पारस येथील प्रकल्पाच्या विस्तारीकरणाबाबतचे सर्व लढे आत्तापर्यंत पारसवासीयांनी जिंकल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आता ६६० मेगावॅट क्षमतेचा विद्युत निर्मिती प्रकल्प व्हावा, याबाबतचा लढासुद्धा जिंकण्यासाठी १७ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता पारस येथे सभा घेऊन प्रकल्पाबाबत निर्णय घेऊन दिशा ठरविण्यात येणार आहे. या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सभेच्या आयोजकांकडून करण्यात आले आहे.