ठळक मुद्देकापड बाजार व सिव्हिल लाईन रोडवरील काही दुकाने उघडली होती. स्त्यांवर लोकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लादले असून, मंगळवार, ६ एप्रिल रोजी पहिल्याच दिवशी अकोला शहरात या लॉकडाऊनबाबत संभ्रमाची स्थिती दिसून आली. जमावबंदी लागू असतानाही रस्त्यांवर लोकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. तर केवळ जिवनावश्यक वस्तुची दुकाने व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही मंगळवारी सकाळी नवीन कापड बाजार व सिव्हिल लाईन रोडवरील काही दुकाने उघडली होती. पोलिस व मनपा प्रशासनाच्या अधिकार्यांनी नंतर ही दुकाने बंद केली. रस्त्यांवर व जिवनावश्यक दुकानांसमोर नागरिकांची गर्दी मात्र कायम आहे. पेट्रोलपंप, गॅस वितरण, भाजीपाला व फळांची दुकाने उघडी आहेत.