शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

युती जोशात; वंचितच्या भूमिकेवर आघाडीची मदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 3:55 AM

अकोला जिल्ह्यातील चित्र : युतीत शिवसेनेला अन् आघाडीत राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?

राजेश शेगोकार अकोला : अकोल्याच्या पाच पैकी चार मतदारसंघात विजय मिळवून भारतीय जनता पक्षाने गेल्या विधानसभा निवडणूकीत नवा विक्रम प्रस्थापित केला. केवळ बाळापूर मतदारसंघात भारिप-बहुजन महासंघाला विजय मिळाला आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपाने ‘शतप्रतिशत भाजप’ हे आव्हान घेऊन केलेल्या मोर्चेबांधणीमध्ये आता शिवसेनेचा दोन तर शिवसंग्रामचा एका मतदारसंघावरचा दावा अडसर ठरण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्येही जागा वाटपावरून दावे-प्रतिदावे रंगले आहेत तर वंचित बहुजन आघाडी यावेळी नव्या दमाने रिंगणात उतरण्याची तयारी करीत असल्याचे चित्र जिल्हाभरात आहे.

लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ ने काँग्रेस आघाडीच्या विजयाचे गणित बिघडविल्यामुळे राज्यभरात ‘वंचित’च्या ताकदीची दखल घेत, नव्याने समीकरणांची मांडणी केली जात असली तरी अकोल्यात मात्र हे आव्हान नवे नाही. अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांची राजकीय राजधानी असलेल्या अकोल्यात त्यांनी भारिप-बमसंच्या माध्यमातून केवळ मतांच्या विभाजनाचीच भूमिका पार पाडली नाही, तर थेट आमदार निवडून आणण्यापर्यंत तिसरा पर्याय दिला आहे.

शिवसेनेने दोन मतदारसंघांची मागणी केली आहे. भाजपाचा आमदार नसलेला बाळापूर हा मतदारसंघ सेनेला देणे भाजपाला सहज शक्य आहे; मात्र सेनेला दोन मतदारसंघ हवे आहेत. कोणत्याही विद्यमान आमदाराचे तिकीट कापून सेनेला मतदारसंघ देणे भाजपाला सध्या तरी शक्य दिसत नाही. त्यातही गेल्यावेळी बाळापूर मतदारसंघ भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामला देण्याचे ठरले होते; मात्र ऐनवेळी चक्र फिरले अन् भाजपाचाच ‘एबी’ फॉर्म दाखल झाला, त्यामुळे बाळापूरसाठी शिवसंग्रामही आग्रही आहे. या पृष्ठभूमीवर सेना व शिवसंग्राम यांची समजूत कशी काढली जाते, यावरच ‘युती’ साठी कोण माती खाणार, हे ठरणार आहे.

दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसही तयारीला लागली आहे; मात्र या तयारीला नेतृत्वाचे बळ कितपत मिळते, यावरच सारे काही अवलंबून आहे. आतापर्यंत आघाडीत काँग्रेसला अकोट, अकोला पूर्व, बाळापूर हे तीन मतदारसंघ मिळत आले आहेत, यावेळी मात्र काँग्रेसने राष्ट्रवादीला हव्या असलेल्या अकोला पश्चिमवरही दावा केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही बाळापूर या मतदारसंघात काँग्रेसने सातत्याने दिलेल्या मुस्लीम उमेदवाराचा पराभव होत असल्याचा मुद्दा समोर करीत या मतदारसंघावर दावा केला आहे. या दोन्ही पक्षांच्या दाव्यामुळे आघाडीत जागा वाटपाचा गुुंता होण्याची चिन्हे आहेत. हा गुंता व्यवस्थित सुटला व उमेदवारीची भाकरी फिरविली तरच दोन्ही काँग्रेसला पुन्हा उर्जितावस्था मिळण्याची संधी आहे. गेल्यावेळी भारिप-बमसं म्हणून रिंगणात असलेला पक्ष यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने आव्हान देण्यास सज्ज आहे. युती, आघाडी व वंचित अशी तिरंगी लढत अपेक्षित असली तरी उद्या वंचित महाआघाडीमध्ये सहभागी झालीच तर युतीसमोरील आव्हान तगडे ठरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पुन्हा जागा वाटप व उमेदवार हा कळीचा मुद्दा ठरेल, एवढे निश्चित.

२०१४मधील निवडणुकीत सर्वांत मोठा विजय :अकोला पश्चिम: गोवर्धन शर्मा (भाजप) । मते : ६६,९३४ फरक ३९,९५३.सर्वांत कमी मताधिक्याने पराभव : अकोला पूर्व : हरिदास भदे (भारिप-बमसं) - २,४४० (विजयी - रणधीर सावरकर, भाजप).एकूण जागा : ०५ । सध्याचे बलाबलभाजप - ०४ , भारिप-बमसं-१

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Akolaअकोला