अकोला : समाजिक क्षेत्रात सदैव कार्यरत असलेल्या माणुसकी फाउंडेशनच्या वतीने शनिवारी रात्री ११ ते २ या वेळेत रस्त्यावर झोपलेल्या निराधारांना पांघरूणचे वाटप करण्यात आले. फाउंडेशनतर्फे सतत तीन वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. समाजातील वंचित घटकांना आधार देण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवण्यात आला. थंडीच्या दिवसात पुरेसे पांघरूण नसलेल्या गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून माणुसकीची ऊब देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमात व्यावसायिक, महिला, बालक, सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविला. उपक्रमासाठी प्रकाश जैन, प्रदीप देशमुख, रवी अंभोरे, शक्ती अंबुसकर, नितेश पवाने, नितेश वानखडे, अमोल काळपांडे, प्रदीप मुरूमकर, सारंग हिंगोलीकर, विशाल गावत्रे, गणेश वाकोडे, अरुणकुमार ढोणे, विकास मस्के, चंद्रकांत भोसले, विशाल गुंटीवार, नितीन डोमकुलवार, वैभव पाटोदकर, अभिजित काळे, चंद्रांशू मानकर, शुभम गासे, प्रवीण पोफळे, निखील पोटे, अनिकेत शिरसाट, अमोल पाचपोर, स्वप्नील तेलगोटे, आकाश ठाकरे, सुहास साबे, आकाश ताले, राहुल धोटे, महेश तायडे, भास्कर शिरभाते, लखन वानखडे, यश आमले, सचिन काळे, वैभव मुरूमकार, राम घोघरे, शुभम अपुने, प्रवीण हुरपडे, वेदांत गावत्रे, विशाल गावत्रे, वैभव दळवी, ऋत्विक तेलगोटे, सुरज किरणापुरे, राहुल पवार, निखिल राऊत, सचिन आंबेकर, राम परकाळे, जय मोरखडे, सिद्धांत गडकरी, पूजा मस्के, प्रतिभा शिरभाते यांनी परिश्रम घेतले.
माणुसकी फाउंडेशनच्या वतीने गरजूंना पांघरूण वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:15 AM