अकाेला : गत वर्षापासून कोरोना संकटामुळे पंढरपूर वारी, यात्रा बंद आहेत. यंदाही काेराेनाचे संकट कायमच असून आषाढी वारी साेहळा हाेणार का याबाबत संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक दहा वारकऱ्यांसह एका पालखीला वारीची परवानगी द्या, अशी मागणी विश्व वारकरी सेनेने केली आहे.
पंढरपूर आषाढी पायदळ वारी साेहळ्यात मानाच्या नऊ पालख्यांसह प्रत्येक तहसीलअंतर्गत पालखी साेहळ्याला परवानगी द्यावी आणि साेहळ्यात १० वारकऱ्यांना मुभा असावी, अशी मागणी विश्व वारकरी सेनेने केली आहे.
काेराेना संकटाचा विचार करून आमचा सरकारकडे माेठ्या प्रमाणात साेहळ्यासाठी आग्रह नाही; मात्र, पालखी सोहळ्याची वारी खंडित होऊ नये, यासाठी तहसील कार्यालय हद्दीतून पालखी सोहळा काढण्याची परवानगी द्यावी. तसेच सोबत कमीत कमी दहा वारकऱ्यांना जाण्याची मुभा असावी, अशी मागणी विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी केली आहे.