अकोला : लॉकडाऊनमुळे राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील १८०० विद्यार्थ्यांना येत्या आठ दिवसात परत आणल्या जाईल व ३ मे पर्यंत त्यांना सुखरूप घरि पोहचविले जाईल असे महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषित केले आहे. या निर्णयाचे स्वागत करतानाच याच धर्तीवर पुणे व मुंबई येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.केंद्र सरकारने विदेशात अडकलेल्या विद्यार्थी व लोकांना विशेष विमानाने भारतातर आणले शिवाय त्यांना त्यांच्या घरि पोहचविले. ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. परंतु पुण्या मुंबई सारख्या शहरात महाराष्ट्राच्या ईतर भागातुन आलेल्या व अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात मात्र सरकार उदासिन असल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातुन गरीब विद्यार्थी विद्यार्थी पुणे व मुंबई येथे शिकतात. आजही या महानगरांमध्ये हजारो विद्यार्थी अडकलेले आहेत. लॉकडाडनमुळे या विद्यार्थ्यांचे जेवनाचे हाल होत आहेत. सर्वच मुलांना हाताने स्वयंपाक करणे जमत नाही. अशावेळी त्यांना उपाशी राहण्याशिवाय पर्याय नाही. हे सर्व विद्यार्थी गेल्या २२ मार्च पासून तिथेच अडकलेले आहेत. सद्या ते करोना संक्रमणा पासून सुरक्षित आहेत. परंतु सध्याची परिस्थिती पाहता खाण्यापीण्याच्या वस्तूंकरीता त्यांना बाहेर पडावे लागत असल्याने त्यांना करोना संसगार्चा धोका कायम आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे पालक त्यांना घरी आणण्याची व्यवस्था करण्यास तयार आहेत; परंतु शासनाला या गरीब विद्यार्थ्यांचा विसर पडल्याचे दिसुन येते हा प्रकार त्या सर्व विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्यासारखा आहे. हवे तर त्या विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी करा; परंतु त्यांना घरी जाण्यास परवानगी द्यावी. जेणेकरून ते सर्व विद्यार्थी करोनाच्या हॉटस्पॉट सारख्या भागातुन त्यांच्या घरि सुखरुप राहतील व प्रशासनाचा देखील ताण कमी होईल अशी मागणी वंचित बहुजन आघाडीची असल्याचे प्रदेश प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितले.