अकोला: अवैध सावकारी प्रकरणामधील आरोपी अल्लू पहेलवान ऊर्फ अलियार खान याच्यासह त्याच्या मुलांचा अटकपूर्व जामीन बुधवारी मुख्य न्यायाधीश देशपांडे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. सावकारी गुन्हय़ामध्ये अटक टाळण्यासाठी अल्लू पहेलवान व त्याच्या मुलांनी न्यायालयात धाव घेतली. बुधवारी मुख्य न्यायाधीश देशपांडे यांच्या न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आरोपींच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे.
अल्लू पहेलवानला जामीन नाकारला
By admin | Published: October 09, 2014 1:33 AM