जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमवेत जिल्हाधिकारी यांच्या दालनात ऑनलाइन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अपर जिल्हाधिकारी नितीन खंडागळे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी निर्देश दिले की, कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व खबरदारी व नियमांचे काटेकोर पालन होईल, याची दक्षता घ्यावी. मतदान केंद्रावर नागरिकांनी मास्क, सामाजिक अंतर व निर्जंतुकीकरण याबाबी कटाक्षाने पालन कराव्यात. मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी यांनी निवडणूक प्रक्रिया निवडणूक विभागाच्या दिशा निर्देशांप्रमाणे पार पाडावी. तसेच निवडणुकीकरिता लागणारे साहित्य, मतदानयंत्र, सील करण्याकरिता लागणारे साहित्य, वाहनांची व्यवस्था व मतदान केंद्रावर आवश्यक सोयीसुविधा यांचे नियोजन झाले असल्याची खात्री करावी. संवेदनशील मतदान केंद्रांवर सुरक्षिततेसंबंधी सर्व कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर मतदान करण्याकरिता आवश्यक उपाययोजनांचे पालन करावे. तसेच नागरिकांनी निर्भयपणे व निष्पक्ष मतदान करावे. आपला मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.