अकोला : भारिप-बहुजन महासंघाचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी करून त्यांना काँग्रेस महाआघाडीत सहभागी करण्यासाठी चर्चा सुरू आहे; मात्र त्यांच्यासोबत एमआयएम येत असेल, तर चालणार नाही. एमआयएम ही भाजपाची ‘बी टीम’ असून, त्या पक्षाच्या हेतूवरच शंका आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी येथे सांगितले.जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्यात ते अकोल्यात बोलत होते. स्थानिक स्वराज्य भवन येथे झालेल्या सभेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व आ. आशिष देशमुख उपस्थित होते. भाजपाला पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी महाआघाडीत सहभागी होण्यासाठी शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतही चर्चासुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
आंबेडकर हवेत, ‘एमआयएम’ मात्र नको - अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 5:22 AM