अकोला, दि. १0- महानगरपालिका निवडणूक रिंगणातील भारिप बहुजन महासंघ उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी शहरातील विविध भागात ह्यकॉर्नरह्ण बैठका घेऊन कार्यकर्त्यांंना मार्गदर्शन केले. भारिप-बमसंचे ६१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या पृष्ठभूमीवर भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर शुक्रवारी अकोला दौर्यावर आले होते. पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ शहरातील हमजा प्लॉट, मोठी उमरी येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करून त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांंना मार्गदर्शन केले. तसेच अकोट फैल, खरप व लहान उमरी भागात कॉर्नर बैठका घेऊन, अँड. आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांंना मार्गदर्शन केले. तसेच मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पक्षाचे जिल्हा व शहर पदाधिकार्यांसह निवडणूक निरीक्षक उपसमितीच्या पदाधिकार्यांची बैठक घेऊन, पक्षाकडून करण्यात आलेल्या निवडणूकविषयक तयारीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण,भारिप-बमसं निवडणूक निरीक्षक उपसमितीप्रमुख बालमुकुंद भिरड, समिती सदस्य माजी आमदार हरिदास भदे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, आसीफखान, डॉ. प्रसन्नजित गवई, भारिप-बमसंचे जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार यांच्यासह पक्षाचे जिल्हा व शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आंबेडकरांनी घेतल्या ‘कॉर्नर’ बैठका!
By admin | Published: February 11, 2017 2:27 AM