- राजरत्न सिरसाट
अकोला : सातपुड्याच्या पर्वत रांगा, पायथ्याशी खडक, दगड, शेती कसणे, करणे म्हणजे खडकासारखे खडतर... पण, आता येथे काळ््या आईने हिरवा शालू पांघरला... ४२ वर्षांच्या संघर्षानंतर सिंचन तलावातून शेतकºयांना पाणी मिळालं तेही विजेविना... महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता हरिदास ताठे यांची संकल्पना आणि शेतकºयांच्या लोकसहभागातून शून्य आधारित सिंचन प्रकल्पातील पाण्याने अंबोडा गावाच्या माळरानावर आजमितीस नंदनवन फुलले.अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी अंबोडा गाव आहे. या भागातील शेतकºयांचे आर्थिक, सामाजिक जीवन उंचावण्यासाठी सन १९७६ मध्ये या गावाच्या वरच्या बाजूला एक धरण बांधण्यात आले आहे. ३१३ एकर सिंचन क्षमता असलेल्या या धरणाच्या लाभ क्षेत्रात ६८ शेतकरी येतात. या धरणाचे पाणलोट क्षेत्र उत्तम असून, हे धरणा पहिल्या दोन-तीन पावसात पूर्ण पाण्याने भरू न जातं. शाश्वत पाणी उपलब्ध असल्याने पाण्याची बचत करू न जास्तीत जास्त शेतकºयांना विनावीज, तुषार, ठिबक सिंचन पद्धतीने या पाण्याचा लाभ शेतकºयांना घेता यावा, हा उद्देश हे धरण बांधण्यामागे होता. पण, ४२ वर्षांत या धरणातून सिंचन झालं ते नावापुरतच... ते म्हणजे ३२.४१ टक्केच. मागील दोन दशकापासून सिंचनासाठीचा कालवा बुजल्याने शेतकºयांना पाणी मिळत नव्हत.हरिदास गुलाबराव ताठे २००४-०५ दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अकोट उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी या सिंचन तलावाची पाहणी केली. या तलावातून उत्तमरीत्या सिंचन होत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांना भेटून, या धरणाची स्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली.शेतकºयांनी पाणी वापर सहकार संस्थेची नोंदणी केली. ताठे यांनी त्यानंतर मागे बघता, या धरणातून शेतकºयांना पाणी देण्याचे नियोजन केले. धरण गावाच्या वरच्या बाजूने असल्याने त्यांनी कालव्याऐवजी पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेतला. पाइपलाइनद्वारे गॅ्रव्हीटेशनल फोर्सद्वारे २४ तास पाणी देण्यासाठी धरणाच्या पात्रात एका बाजूला जॅकवेल बांधण्यात आलेली आहे. त्या जॅकवेलमधून धरणाच्या बाहेर २.५० व्यासाचे तीन पाइप काढण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी तीन वेगळे प्लॉस्टिकचे पाइप जोडण्यात आले. विजेचा वापर न करता येथे २४ तास सिंचन व्यवस्था सुरू झाली आहे. शेत तेथे पाइपलाइन टाकण्यात आली असून, शेतकºयांनी त्यासाठी प्रतिएकर ९ हजार रुपये एकूण ९ लाख रुपये त्यासाठी खर्च केला. आजमितीस येथे ३४ एकरावर सिंचन करण्यात येत असून, शेत तेथे पाण्याचे पाइप टाकण्यात आले आहेत.
धरणातील पाण्याचा हिशेबप्रत्येक शेतासाठी स्वतंत्र पाणी पुवरठा व्यवस्थापन असून, धरणातील पाण्याचा लीटरमध्ये हिशेब ठेवण्यात येतो. सर्व शेतकºयांना एकाचवेळी पाणी उपलब्ध होत असून, शेतकरी आवश्यकतेनुसार केव्हाही पाणी उचलतात. विशेष म्हणजे ओलिताकरिता मजूरही लावण्याची गरज नाही.