शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शहरातील दोन बुकींकडून ३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

By admin | Published: April 24, 2017 1:45 AM

शहरात ‘आयपीएल’ सामन्यांवर कोट्ट्यवधींचा सट्टा

अकोला : आयपीएलच्या दहाव्या सत्रात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यामध्ये शनिवारी रात्री खेळल्या जात असलेल्या सामन्यावर लाखो रुपयांचा सट्टा खेळणाऱ्या येथील दोन बुकींना अटक करून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी ही कारवाई केली. दरम्यान, आयपीएलचा रंग आता चढत असतानाच अकोला शहरातील बुकी सक्रिय झाले असून, त्यांनी कोट्ट्यवधी रुपयांचा सट्टा खेळणे सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जुने शहरातील भगतवाडी परिसरात दोन बुकींकडून मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यावर लाखो रुपयांचा सट्टा लावण्यात आल्याची माहिती मिळाली. यावरून पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शनिवारी रात्री भागवतवाडी येथील दोन बुकींच्या घरी छापा टाकला आहे. या छाप्यामध्ये तब्बल तीन लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, क्रिकेट सट्टा घेणारे बुकी प्रतीक कोठारी आणि अभिषेक मोयाल या दोघांना अटक करण्यात आली. या दोन बुकींकडून एक लाख ९४ हजार रुपये रोख आणि अडीच लाख रुपयांचे दहा मोबाइल, एक टीव्ही, डिश टीव्ही, लॅपटॉपसह साडेतीन लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या बुकींना शनिवारी रात्रीपासून तर रविवारी दुपारपर्यंत सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही बुकींचा जामीन झाल्यावर त्यांची रविवारी सायंकाळी सुटका करण्यात आली.शहरातच बुकींचा ठिय्याआयपीएल सुरू होताच सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळण्यात येतो. यामध्ये बुकींच्या विविध टोळ्या सक्रिय झाल्या असून, त्यांचे ठिय्ये शहरातच विविध भागात थाटण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आलिशान कारमध्ये, शहरातील काही पॉश निवासस्थान आणि फ्लॅटमध्ये बुकींनी त्यांचे अड्डे बनविले आहेत. या ठिकाणांवरूनच क्रिकेट सामन्यांवर कोट्ट्यवधी रुपयांचा सट्टा लावण्यात येत आहे.श्रेय लाटण्याची स्पर्धापोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची बदली होणार असल्याची चर्चा असल्याने काही पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी बुकींना खुली सूट दिली असल्याचीही चर्चा आहे. बुकींवर शनिवारी रात्री पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी कारवाई केली; मात्र या कारवाईचे श्रेय स्थानिक गुन्हे शाखेने लाटण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस वर्तुळातील सूत्रांचे म्हणणे आहे.