लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील एका व्यापाºयाचे अकोल्यातून नेण्यात येत असलेले धान्याचे तीन ट्रक सोडण्यासाठी सुमारे ९० हजार रुपये लाचेची मागणी करणाºया अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यातील ठाणेदाराच्या वाहनाच्या चालकास ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात केली. वसीम करीम शेख असे लाचखोर चालकाचे नाव असून अकोला एसीबीने जुने शहरातील नवीन किराणा बाजारातून सोमवारी रात्री त्याला अटक केली.वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एका ५४ वर्षीय व्यापाºयाची धान्याची तीन वाहने सोडण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनमध्ये चालक पदावर कार्यरत असलेला तसेच अकोल्यातील जुने शहरातील शिवाजी नगरातील रहिवासी असलेला वसीम करीम शेख या लाचखोर पोलीस कर्मचाºयाने तब्बल ९० हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच सदरचे वाहन दर महिन्याला सोडण्यासाठी महिन्याकाठी १५ हजार रुपयांची लाच लागणार असल्याचे त्याने व्यापाºयास सांगितले; मात्र तक्रारकर्त्यास ही लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.यावरून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख शरद मेमाने यांनी २४ आॅगस्ट रोजी पडताळणी केली असता पोलीस शिपाई वसीम करीम शेख याने १ लाख ५ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवार २४ आॅगस्टला सायंकाळी लाच घेण्याचे ठिकाण ठरल्यानंतर सापळा रचून असलेल्या अकोला एसीबीने लाचखोर पोलीस कर्मचारी वसीम करीम शेख याला ४० हजार रुपयांची लाच घेताना जुने शहरातील नवीन किराणा बाजारातून रंगेहात अटक केली.त्याच्याकडून ४० हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला एसीबीचे प्रमुख शरद मेमाने यांच्या निर्देशाने पोलीस कर्मचारी संतोष दहीहांडे, सचिन धात्रक, अभय बावस्कर, इम्रान अली यांनी केली. सदर लाचखोर पोलीस कर्मचाºयाविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
९0 हजारांची केली होती मागणीलाचखोर पोलीस कर्मचारी वसीम करीम शेख याने तीन ट्रक सोडण्यासाठी तब्बल ९0 हजाराची मागणी केली होती. या रकमेत आणखी किती हिस्सेदार होते, याची चौकशी आता सुरु झाली आहे.