अतुल जयस्वाल, अकोला: गुजरात राज्यातील सुरत रेल्वेस्थानकाचा पहिल्या टप्प्यातील पुनर्विकास १० जून ते ७ सप्टेंबर या कालावधीत केला जाणार आहे. या ९० दिवसांच्या कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक ४ प्रवासी वाहतुकीसाठी बंद राहणार असल्यामुळे अमरावती-सुरत एक्स्प्रेस उधनापर्यंत धावणार आहे.
या कालावधीत अनेक गाड्या प्रभावित होणार आहेत. यामध्ये ८ गाड्या सुरत स्थानक ऐवजी उधना स्थानकावरून प्रस्थान करतील, तर ९ गाड्या सुरत स्थानक ऐवजी उधना स्थानकापर्यंत धावतील. या कालावधीत अकोला मार्ग धावणारी २०९२५ अमरावती- सुरत एक्स्प्रेस १० जून ते ७ सप्टेंबर या कालावधीत उधना स्थानकापर्यंत धावेल. तर २०९२६ सुरत-अमरावती एक्स्प्रेस उधना स्थानकावरून रवाना होणार आहे.