अकोला : आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता मध्य रेल्वेने विशेष गाड्या सुरु करण्याचा धडाकाचा लावला असून, येत्या २० ऑक्टोबरपासून अमरावती-तिरुपती-अमरावती ही विशेष रेल्वे गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी पुर्णपणे आरक्षीत असून, यासाठी १७ ऑक्टोबरपासून आरक्षण सुविधा सुरु होणार आहे.मध्य रेल्वेच्या भूसावळ मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०२७६५ डाउन तिरुपती ते अमरावती विशेष गाडी ही २० ऑक्टोबरपासून ते २८ नोव्हेंबर पर्यंत दर मंगळवार व शनिवारी तिरुपती येथून दुपारी ३.१० वाजता प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी दुपारी २.५० वाजता अमरावती स्थानकावर पोहचेल. ही गाडी दर बुधवार व रविवारी दुपारी १.१५ वाजता अकोला स्थानकावर येऊन १.२० वाजता अमरावतीकडे प्रस्थान करेल.गाडी क्रमांक ०२७६६ अप अमरावती ते तिरुपती ही विशेष गाडी २२ ऑक्टोबरपासून दर सोमवार व गुरुवारी अमरावती स्थानकावरून सकाळी ६. ४५ वाजता प्रस्थान करून सकाळी ८.१० वाजता अकोला स्थानकावर येईल. येथून सकाळी ८.२० वाजता वाशिमकडे मार्गस्थ होऊन दुसºया दिवशी सकाळी ६.४० वाजता पोहचणार आहे. या गाड्यांना बडनेरा अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत, पुर्णा, नांदेड, मुखेड, धर्माबाद, याठिकाणी थांबा असेल. प्रवास करताना प्वाशांना कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
अमरावती- तिरुपती विशेष रेल्वे गाडी २० ऑक्टोबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 5:02 PM