अकोला : पटियाला (पंजाब) येथे आयोजित आंतरराष्ट्रीय ड्युल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत अकोला क्रीडा प्रबोधिनीचा बॉक्सर अनंता चोपडे याने ५२ किलो वजनगटात सिंगापूरच्या हामीद एम.डी. बिन यांचा गुणांच्या आधारावर पराभव करू न भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.अनंता हा अकोला क्रीडा प्रबोधिनीचा प्रशिक्षणार्थी असून, राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहे. अनंताने याआधी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत पदक आणि मेट्रो कप जिंकला होता. सब-ज्युनिअर राष्ट्रीय व शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. सातत्याने आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी होत आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक नरेंद्र सोपल, उपसंचालक क्रीडापीठ व्यंकटेश, अमरावती विभाग क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख महाराष्ट्र बाक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष जय कोहली, सचिव भरत व्हावळ, राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांनी अनंताचे कौतुक केले.
आंतरराष्ट्रीय ड्युल बॉक्सिंग स्पर्धेत अनंता चोपडे अजिंक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 1:55 AM
अकोला : पटियाला (पंजाब) येथे आयोजित आंतरराष्ट्रीय ड्युल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत अकोला क्रीडा प्रबोधिनीचा बॉक्सर अनंता चोपडे याने ५२ किलो वजनगटात सिंगापूरच्या हामीद एम.डी. बिन यांचा गुणांच्या आधारावर पराभव करू न भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.अनंता हा अकोला क्रीडा प्रबोधिनीचा प्रशिक्षणार्थी असून, राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांच्या ...
ठळक मुद्देसिंगापूरच्या हामीदला चारली धूळ