शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

...अन् धावत्या रेल्वेत मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी वाचविले वृद्धेचे प्राण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:01 PM

क्षणाचाही विलंब न करता मेडिकलच्या तीन विद्यार्थ्यांनी वृद्धेला सीपीआर देत तिचे प्राण वाचवले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘देव तारी त्याला कोण मारी...’ असाच काहीसा प्रसंग सोमवारी अमरावती-सुरत एक्स्प्रेसमधील एका ७० वर्षीय वृद्ध महिला प्रवाशासोबत घडला. अमरावतीवरून निघालेल्या सुरत एक्स्प्रेसमध्ये अचानक या वृद्ध महिलेच्या हृदयाचे ठोके बंद पडले अन् एकच गोंधळ निर्माण झाला. तेवढ्यात क्षणाचाही विलंब न करता मेडिकलच्या तीन विद्यार्थ्यांनी वृद्धेला सीपीआर देत तिचे प्राण वाचवले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या अंतिम वर्षाला शिकत असलेले मिलिंद घोरापुरे, सदानंद चेके आणि चंदन चव्हाण हे तिन्ही विद्यार्थी सोमवारी सकाळी सुरत एक्स्प्रेसने अमरावतीहून अकोल्यासाठी निघाले होते.बडनेरा रेल्वे स्टेशन ओलांडल्यानंतर रेल्वेतील ७० वर्षीय वृद्ध प्रवासी महिला तिच्या आसनावरून अचानक कोसळली. सुमन असे त्या महिलेचे नाव आहे. धावत्या रेल्वेत घडलेल्या या घटनेमुळे इतर प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. बघ्यांची गर्दी दिसताच तिन्ही तरुणांनी आपण वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचा परिचय देत महिलेला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले.मिलिंद घारापुरे या विद्यार्थ्याने महिलेला उचलून रेल्वेतील आसनावर झोपविले अन् तिच्या छातीवर दाब देऊन (सीपीआर) हृदय सुरू करण्याचा प्रयत्न केला; पण महिलेकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने तिन्ही विद्यार्थ्यांनी सीपीआरचा वेग वाढविला.दरम्यान, सदानंद चेके या विद्यार्थ्याने तोंडाद्वारे वृद्धेला श्वास भरण्यास सुरुवात केली. तर चंदन चव्हाण या विद्यार्थ्याने महिलेचे पाय चोळण्यास सुरुवात केली. जवळपास १० ते १५ वेळा ही प्रक्रिया केल्यानंतर वृद्ध महिलेने हुंदका देत श्वास घेण्यास सुरुवात केली. महिलेच्या हृदयाची धडधडही सुरू झाली. अकोल्यात पोहोचताच वृद्ध महिलेच्या नातेवाइकांनी महिलेला खासगी रुग्णालयात दाखल केले.‘जीएमसी’तर्फे विद्यार्थ्यांचा सत्कारशासकीय वैद्यकीय महाविद्यालायच्या तिन्ही भावी डॉक्टरांनी रुग्णसेवेचे कर्तव्य पार पाडत वृद्ध महिलेचे प्राण वाचविले. त्यांच्या या कार्याचे कौतुक करत अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामकुमार सिरसाम, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख आदींनी त्यांचा गौरव केला.

प्रवासादरम्यान वृद्ध महिलेचे हृदय, फुप्फुस आणि नाडी बंद झालेली आम्हाला आढळली. अशा वेळी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ उपचार सुरू होणे आवश्यक असतात. म्हणून आम्ही सीपीआरचा अवलंब केला. सदानंद, चंदन आणि मी आमच्या काही मिनिटांच्या प्रयत्नानंतर आजीबाईचे हृदय सुरू झाले.- मिलिंद घारपुरे, विद्यार्थी, एमबीबीएस, जीएमसी, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वेAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय