शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

अंगणवाडी सेविका, मदतनीस प्रशिक्षणाच्या देयकाचा वाद

By admin | Published: April 13, 2017 1:53 AM

अकोला- काहींना कनिष्ठांच्या स्वाक्षरीशिवायच देयकावर स्वाक्षरी देत आहेत, तर काहींना कनिष्ठांच्या स्वाक्षरीसाठी वेठीस धरण्याच्या प्रकारामुळे बुधवारी दुपारी या विभागात ‘तू तू-मै मै’ झाली.

मनमानीपणामुळे प्रकल्प अधिकारी त्रस्त

अकोला : अंगणवाडीसेविका, मदतनिसांना पाच लाख रुपये निधी खर्चातून प्रशिक्षणाचे देयक अदा करण्यावरून महिला व बालविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद उद्भवत आहेत. महिला व बालविकास काहींना कनिष्ठांच्या स्वाक्षरीशिवायच देयकावर स्वाक्षरी देत आहेत, तर काहींना कनिष्ठांच्या स्वाक्षरीसाठी वेठीस धरण्याच्या प्रकारामुळे बुधवारी दुपारी या विभागात ‘तू तू-मै मै’ झाली. अंगणवाडीसेविका, मदतनिसांना प्रशिक्षणासाठी पाच लाख रुपयांची तरतूद होती. जिल्ह्यातील आठही प्रकल्प स्तरावर हा निधी देण्यात आला. प्रशिक्षण कार्यक्रम घेतल्याचे देयक संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी तयार केले. ते मिळण्यासाठी जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी एस.पी. सोनकुसरे यांची प्रतिस्वाक्षरी आवश्यक आहे. आधी मूर्तिजापूर प्रकल्प अधिकाऱ्यांच्या ६० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या देयकावर सोनकुसरे यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर अकोट प्रकल्प अधिकाऱ्यांनी देयक त्यांच्याकडे आणले. त्यावर सोनकुसरे यांनी स्वाक्षरी केली नाही. त्यांनी स्वाक्षरी हवी असल्यास कार्यालयातील सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, संबंधित लिपिकाची स्वाक्षरी घेण्याचे सांगितले. त्यामुळे प्रकल्प अधिकाऱ्यांनी संबंधितांकडे धाव घेतली. मात्र, सोनकुसरे यांनी आधी स्वाक्षरी केलेल्या मूर्तिजापूरच्या देयकावर कार्यालयातील कुणाचीही स्वाक्षरी घेतली नाही. त्यामुळे अकोटच्या देयकावर स्वाक्षरी करण्याचा प्रश्नच येत नाही, असा पवित्राही संबंधितांनी घेतला. अडवणूकच करायची असेल, तर मूर्तिजापूरच्या देयकावर स्वाक्षरी करताना का केली नाही. अकोटचे देयक का अडवले, हा प्रश्नही यानिमित्ताने पुढे आला. या प्रकाराला आर्थिक लाभाची किनार असल्याची चर्चा या विभागात बराच वेळ होती. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी सोनकुसरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.